30 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रराऊत आणि पटोले : कोण चोमडे, कोण चाटू ? महाविकास आघाडीत शाब्दिक...

राऊत आणि पटोले : कोण चोमडे, कोण चाटू ? महाविकास आघाडीत शाब्दिक गुद्दागुद्दी

याआधीच राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. मुखपत्राने आपापल्या पक्षाचे पाहावे, उगाच दुसऱ्या पक्षात नाक खुपसू नये, असे पवार म्हणाले होते. तसाच वाद आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राऊत रंगला आहे.

राऊत आणि पटोले यांच्यात कोण चोमडे, कोण चाटू ? यावरून महाविकास आघाडीत शाब्दिक गुद्दागुद्दी सुरू झाली आहे. याआधीच राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. मुखपत्राने आपापल्या पक्षाचे पाहावे, उगाच दुसऱ्या पक्षात नाक खुपसू नये, असे पवार म्हणाले होते. तसाच वाद आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राऊत रंगला आहे.

एकीकडे शरद पवार यांनी राष्ट्रवादी अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय मागे घ्यावा म्हणून त्यांची मनधरणी केली जात आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीतील शिवसेना आणि कॉंग्रेस या घटक पक्षातील दोन महत्त्वाच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. पवारांचा निर्णय राज्यातील राजकीय वर्तुळात, त्यातही महाविकास आघाडीत खळबळ माजवणारा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या भवितव्यावरही कदाचित परिणाम होऊ शकतो. असे सारे असताना नाना पटोले आणि संजय राऊत हे बाह्या सारसावून एकमेकांना भिडले आहेत.

संजय राऊत यांनी चोमडेगिरी बंद करायला हवी, असा दम पटोले यांनी भरला आहे. त्यावर चाटू कोण आणि चोमडे कोण हे कळेलच, असे राऊतांनी म्हटले आहे. चाटूगिरी कोण करत आहे, ते येणारा काळच ठरवेल, असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे. 

 

 नाना पटोले काय म्हणाले?

संजय राऊत यांनी चोमडेगिरी बंद करावी. ते काही कॉंग्रेसचे प्रवक्ते नाहीत. ज्या कुटुंबाने देशासाठी बलिदान दिले आहे, पंतप्रधानपदही सोडले आहे, राहुल गांधी यांनी स्वत: कॉँग्रेसचे अध्यक्षपद सोडून दुसऱ्याला दिले आहे. अशा गांधी कुटुंबावर राऊतांनी बोलणे हे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे.

संजय राऊत काय म्हणाले? 

हे पटोले परवा मला व्यासपीठावर भेटले तेव्हा चांगले  बोलले होते. आता चाटूगिरी कोण करत आहे, ते येणारा काळ ठरवेल. शिवसेनेने कधीही अशी भूमिका घेतलेली नाही. तुम्ही महाविकास आघाडीत आहात, त्यामुळे तोंडावर बंधन घाला. आम्ही तुमच्याविषयी बोलू लागल्यास चोमडे कोण आणि चाटू कोण हे कळेल.

हे सुद्धा वाचा : 

संजय राऊत यांचे तोंड म्हणजे कपडे सुकविण्याचे बॉयलर

अजित पवारांच्या मंत्रीपदाबद्दल संजय राऊत बोलू शकत नाहीत, मी पक्षाचा अध्यक्ष आहे : शरद पवार

कोण संजय राऊत? अजित पवार यांचा संतप्त सवाल

Chatu Chomde, Raut Patole Tongue War, Sanjay Raut, Nana Patole, Mahavikas Aghadi

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी