28 C
Mumbai
Friday, December 8, 2023
घरमहाराष्ट्र'अजित पवारांनी भुजबळांना समज द्यावी नाहीतर..' जरांगे पाटलांचा इशारा

‘अजित पवारांनी भुजबळांना समज द्यावी नाहीतर..’ जरांगे पाटलांचा इशारा

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे-पाटील यांनी आज (14 ऑक्टोबर) जाहीर सभा घेतली होती. या सभेत मराठा आरक्षणाबद्दल भूमिका स्पष्ट केली. तसेच, सरकारला दिलेल्या 40 दिवसांच्या अल्टिमेटमला आता फक्त 10 दिवस शिल्लक असल्याचीही आठवण सरकारला करून दिली. यावेळी, त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार पलटवार केला. मनोज जरांगे-पाटील यांनी या सभेसाठी 7 कोटींचा खर्च केल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता. एवढा पैसा जरांगेंनी कुठून आणला, असा सवालही भुजबळांनी केला होता. त्या आरोपांंना उत्तर देताना जरांगे-पाटील यांनी सभेत भुजबळ यांचे नाव न घेता टीका केली.

छगन भुजबळ यांनी गुरुवारी, (12 ऑक्टोबर) एका सभेत मनोज जरांगे-पाटील यांच्यावर टीका करत, ‘अंतरवाली सराटी येथील सभेसाठी 7 कोटी रुपये कुठून आले? मनोज जरांगे-पाटील राज्यभर करत असलेल्या दौऱ्यांना तसेच अंतरवाली सराटी येथील सभेसाठी 100 एकर जमिनीसाठी पैसे कुठून आले?’ असा सवाल विचारला होता.

काय म्हणाले जरांगे-पाटील भुजबळांना?

भुजबळांनी केलेल्या आरोपांवर उत्तर देत मनोज जरांगे पाटील यांनी नाव न घेता एकेरी उल्लेख करत भुजबळांवर टीका केली. ते म्हणाले, “मी अजित पवारांना विनंती करतो की, त्यांनी छगन भुजबळ यांना समज द्यावी. माझ्या नादी ते लागले तर मग काही खरं नाही, मी सोडणार नाही.”

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मराठ्यांना उचकवायला सांगितलं आहे. त्यासाठीच छगन भुजबळ आणि गुणरत्न सदावर्ते हे बोलत आहेत. पण आपल्याला शांततेच्या मार्गाने लढायचं आहे. उद्रेक जाळपोळ होणार नाही यांची काळजी घ्यायची आहे, पण आरक्षण घेतल्याशिवाय मागेही हटायचं नाही,” असं जरांगे-पाटील म्हणाले.

हे ही वाचा 

जरांगेंचे राजकीय बॉस शरद पवार, गुणरत्न सदावर्ते यांचा गंभीर आरोप

अजितदादा… २४ तास ऑन ड्युटी

मराठ्यांना अंगावर घेऊ नका, जरांगेंचा सरकारला इशारा

भुजबळांच्या सात कोटींच्या आरोपांना उत्तर देताना जरांगे-पाटील यांनी भुजबळांचा उल्लेख ‘येडपट’ असा केला. ते म्हणाले, “आधी म्हणाले, मराठा आरक्षणाला आपला विरोध नाही. पण काल पुन्हा फडफड करायला लागले. काल म्हणाले, सभेसाठी सात कोटी खर्च आला, त्यांच्याकडे पैसे कुठून आले? मला त्यांना सांगायचंच आम्ही 100 एकर जमीन विकत घेतली नाही. सभेसाठी फक्त मैदान भाड्यानं घेतलंय. मराठा बांधवांनी येण्याजाण्यासाठी गाड्या फुकट दिल्यात. माझ्या मायबापाने कापूस विकून 100-500 रुपये जमा केले आणि सभेचा खर्च केला. लोक तुम्हाला पैसे देत नसतील पण आम्हाला देतात. पण 123 गावांनी आजचा सगळा खर्च केलाय. ज्या गोरगरिब मराठ्याने तुम्हाला मोठं केलं त्यांचंच रक्त पिऊन तुम्ही पैसा कमावला म्हणून तुमच्यावर धाड पडली आणि तुम्ही जेलमध्ये गेलात आणि आम्हाला शिकवता पैसे कुठून आले?”

भुजबळांकडून प्रत्युत्तर

जरांगे-पाटील यांच्या टीकेनंतर छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधून जरांगे पाटलांना उत्तर दिले आहे. भुजबळ म्हणाले, “माझ्या राजकीय कारकिर्दीत मी अनेक मराठा नेत्यांसह काम केलं. जयंत पाटील, अजित पवार या मराठा नेत्यासोबत मी काम केलं आहे. माझं देखील काहीतरी योगदान आहे. म्हणूनच मला संधी दिली गेली असेल. शिवसेनेचा जन्म झाला तेव्हापासून मी समाजकार्यात आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मी शिवसेना सोडली. मराठ्यांनी मला मोठं केलं, असं सांगून शिव्या दिल्या जात आहेत. मला मोठं हे शिवसेना पक्ष आणि बाळासाहेब ठाकरे यांनी केलं.”

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी