29 C
Mumbai
Tuesday, August 2, 2022
घरमहाराष्ट्रएका सुयोग्य व्यक्तीची राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्याची छत्रपती संभाजी महाराजांची मागणी

एका सुयोग्य व्यक्तीची राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्याची छत्रपती संभाजी महाराजांची मागणी

टीम लय भारी

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबई आणि ठाणेबाबत केलेल्या वक्तव्याचा सर्वांकडूनच तीव्र निषेध करण्यात येत आहे. सावध पवित्रा घेत एकनाथ शिंदे गट आणि भाजपकडून राज्यपालांच्या या वक्तव्याबाबत मत व्यक्त करण्यात आले आहे. पण विरोधकांकडून मात्र भगतसिंग कोश्यारी यांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेण्यात आला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि बऱ्याच राजकीय पुढाकाऱ्यांनी राज्यपालांना सोशल मीडियाच्या माध्यमातून खडेबोल सुनावत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. माजी खासदार छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांनी सुद्धा राज्यपालांच्या या वक्तव्याचा निषेध करत मत व्यक्त केले आहे. एका सुयोग्य व्यक्तीची राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी (Chhatrapati Sambhaji Maharaj’s demand to appoint a suitable person as Governor) छत्रपती संभाजी महाराज यांनी त्यांच्या ट्विटमधून केली आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची जीभ वारंवार घसरत आहे. राज्यपाल नेहमीच पातळी सोडून बोलतात. त्यांच्या वक्तव्यांमुळे राज्यपाल पदाचीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र राज्याची प्रतिमा डागाळत असल्याचे छत्रपती संभाजी महाराज यांनी सांगितले. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याकडे गांभीर्याने लक्ष घालून एक सुयोग्य व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्त करावा, अशी मागणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ट्विटरमध्ये उल्लेख करून केली आहे.

हे सुद्धा वाचा :

एकनाथ शिंदे 25 वर्षे गप्प का बसलात ?

‘महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले’-अजित पवार

जयंत पाटलांनी राज्यपालांना दुसऱ्या राज्यात जाऊन राहण्याचा दिला सल्ला

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!