29 C
Mumbai
Wednesday, August 3, 2022
घरमहाराष्ट्रमुख्यमंत्री 'महाराष्ट्रा'चे; कामाचा धडाका मात्र 'ठाण्यात' !

मुख्यमंत्री ‘महाराष्ट्रा’चे; कामाचा धडाका मात्र ‘ठाण्यात’ !

टीम लय भारी

मुंबई : ‘ठाणे’ हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. ‘ठाण्या’च्या पलिकडे शिंदे यांचा यापूर्वीपर्यंत फार प्रभाव नव्हता. ‘ठाण्या’ने एकनाथ शिंदे यांना भरपूर ‘काही’ दिले. राजकीय व आर्थिक ताकद ठाण्यानेच शिंदे यांनी दिली. आता मुख्यमंत्री (Chief Minister ) होताच शिंदे यांनी ‘ठाण्या’चे ऋण फेडण्यास सुरूवात केली आहे. आज एकाच दिवसांत शिंदे यांनी ठाण्याशी संबंधित काही महत्वाचे निर्णय (Chief Minister of ‘Maharashtra’; But the blast of work in ‘Thane’!) घेतले.

कळव्यात अद्ययावत बसपोर्ट विकसित करण्यात येणार
कळव्यामध्ये राज्य परिवहन मंडळाची जागा आहे. याठिकाणी अनेक एसटी बसेस या दुरूस्तीसाठी येत असतात. त्यामुळे या जागेवर अद्ययावत बसपोर्ट विकसित करण्यात येणार आहे. या जागेवर बस दुरुस्ती करण्याची जागा, भांडार विभाग, गाड्या धुण्यासाठी वॉशिंग रूम, वॉचमन केबिन, स्क्रॅपयार्ड, ज्या गाड्या याठिकाणी दुरुस्तीसाठी येतात त्या उभ्या करण्यासाठी जागा व इतर सुविधांसह याबाबतचा संपूर्ण आराखडा तयार करून देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

त्याचबरोबर ठाणे रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या जागेत एसटी डेपोसोबतच सार्वजनिक पार्किंग, वाणिज्य वापराचे बांधकाम, चालक आणि वाहक यांच्यासाठी विश्रांतीगृह, आरक्षण व चौकशीसाठी कक्ष, प्रवाश्यांच्या उतरण्यासाठी स्वतंत्र सोय, कार्यालय आस्थापन या संपूर्ण बाबींचा सुधारित आराखडा तयार करून देण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आल्या.

ठाणे आयआयटीच्या जागेत क्लस्टर डेव्हलपमेंटकरीता ठाणे मनपाला बैठक घेण्याचे आदेश
ठाण्यातील आयआयटीच्याबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली. यामध्ये ठाणे आयआयटी आणि कोपरी आयआयटी यांच्या ताब्यात जी जागा आहे ती क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी ठाणे महानगरपालिकेकडे देण्यात यावी, तसेच या जागेवरील ज्या इमारती जुन्या झाल्या आहेत, किंवा मोडकळीस आल्या आहेत त्यांच्या दुरुस्ती आणि पुनर्विकासाबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावे. हे करत असताना आयआयटीच्या मुलांचे नुकसान होणार नाही अशा पद्धतीने नियोजन करावे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले. यासाठी कौशल्य विकास विभाग आणि ठाणे महानगरपालिका यांनी त्वरित संयुक्त बैठक घ्यावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले.

ठाण्यातील तहसील आणि सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाचा पुनर्विकास करणे
ठाण्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि तहसील विभागाच्या कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात येत आहे. हे नूतनीकरण लवकरात लवकर करण्यात यावे. तसेच या कार्यालयांच्या पुनर्विकासाचा एकत्रित प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात यावा अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून यावेळी देण्यात आल्या.

ठाणे महानगरपालिकेने सर्व शासकीय कार्यालयांना असलेल्या आताच्या जागेपेक्षा दुप्पट जागा मिळेल, असे नियोजन करावे. ठाण्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वसाहतीचे पुनर्विकास करण्यासाठी देखील प्रस्ताव सादर करावा. तसेच त्याठिकाणी असलेली काही जागा बस टर्मिनससाठी देता येईल का ? याचा विचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

शासकीय कार्यालयांचे नूतनीकरण करताना ही कार्यालये बंद राहू नये, यासाठी या कार्यालयांचे स्थलांतर काही काळासाठी जवळ असणाऱ्या कन्या शाळेत करून देण्यात यावे. या सर्व गोष्टींचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत घेतला.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्याबाबत घेतलेले निर्णय महत्वाचे असले तरी, मंत्रिमंडळाचा विस्तार न करता मुख्यमंत्री शासन निर्णय घेत असल्याने असे निर्णय घेण्याचे काम मंत्रिमंडळाशिवाय आणखी किती महिने चालणार असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.

हे सुद्धा वाचा :

खासदार भावना गवळींच्या पूर्वाश्रमीच्या पतीने केला शिवसेनेत प्रवेश

आदेशापूर्वीच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार, सुप्रीम कोर्टचा धक्का

मंत्रिमंडळाच्या बैठकीत खडाजंगी; मुख्यमंत्र्यांवर अन्य मंत्री वैतागले !

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!