28 C
Mumbai
Thursday, August 4, 2022
घरमहाराष्ट्रआजपासून मुख्यमंत्री शिंदेंचा महाराष्ट्र दौरा, पूरग्रस्तांना मिळणार दिलासा?

आजपासून मुख्यमंत्री शिंदेंचा महाराष्ट्र दौरा, पूरग्रस्तांना मिळणार दिलासा?

टीम लय भारी

राज्यात पूरपरिस्थितीमुळे हैराण झालेले शेतकरी आणि नागरिक ‘मुख्यमंत्री, प्रशासन आमच्याकडे लक्ष देत नाहीत’ म्हणून तक्रारीचा सूर आळवत आहेत, तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीवारीत व्यस्थ असल्याचे दिसून आले त्यामुळे विरोधकांकडून सुद्धा नेमका हाच मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. या संपुर्ण पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांचा अखेर आजपासून महाराष्ट्र दौरा सुरू होणार असून ते पूरग्रस्त भागात सुद्धा भेट देऊन पाहणी करणार आहेत.

शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदा महाराष्ट्र दौरा करणार आहेत. हा दौरा आज सायंकाळी 4 वाजता सुरू होणार असून मुख्यमंत्री त्यांच्या शासकीय निवास्थानाहून नाशिकमार्ग मालेगावकडे रवाना होणार आहेत. त्यानंतर रात्री 10 वाजेपर्यंत मुख्यमंत्री मालेगाव शासकीय विश्रामगृह येथे पोहोचतील, रात्री त्यांचा तिथेच मुक्काम असेल. 30 जुलै म्हणजेच उद्या सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री शिंदे अतिवृष्टीग्रस्त भागाच्या दौऱ्यास सुरवात करणार आहेत.

मुख्यमंत्री आपल्या दौऱ्याची सुरवात मालेगावपासून करणार असून या दौऱ्याबाबत बोलताना मालेगावचा उल्लेख जि.(जिल्हा) मालेगाव असा करण्यात आला, त्यामुळे पहिल्याच मालेगाव दौऱ्यात मालेगाव जिल्हा करण्यासंदर्भातील प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कसा असेल मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्र दौरा?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महाराष्ट्र दौरा 29 जुलै म्हणजेच आजपासून सुरू होणार आहे. आज सायंकाळी मुख्यमंत्री शिंदे शासकीय निवासस्थानावरून शहापूर इगतपूरी (घोटी)- नाशिक मार्गे मालेगावकडे मार्गस्थ होणार आहेत. मालेगाव येथे रात्री दहाच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचे आगमन होईल, त्या रात्री मुख्यमंत्री मालेगाव शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम करतील.

उद्या म्हणजेच 30 जुलै रोजी सकाळी 10 वाजता ते पूरग्रस्त भागाचा दौरा सुरू करतील. तिथे पाऊस, अतिवृष्टी पिक- पाणी आणि विकास कामे विभागीय आढावा घेण्यात येईल. सकाळी अकराच्या सुमारास मालेगाव शहरातील क्रिडा संकुलात नाशिक ग्रामीण घटकातील नविन शासकीय निवासस्थान प्रकल्प प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात येईल.

यानंतर बोरी-आंबेदरी आणि दहिकुटे कालवा भूमिपूजन, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत काष्टी, ता. मालेगांव जि. नाशिक येथे कृषी विज्ञान संकुलचे भूमिपूजन महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान रस्ते विकास प्रकल्पाचे भूमिपूजन, जल जिवन मिशन-दाभाडी 12 गांव, माळमाथा 25 गांव. 26 गांव पा.पु. योजना, चंदनपुरी व 32 गावांच्या वैयक्तीक पा.पु. योजना यांचा सुद्धा यावेळी उद्धाटन सोहळा पार पडणार असून याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

दरम्यान, यानंतर दुपारी बाराच्या सुमारास त्यांची पत्रकार परिषद पार पडणार आहे, त्यानंतर मालेगावला दुपारी पोलीस मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभा संपली की दुपारी तीनच्या सुमारास मुख्यमंत्री शिंदे मालेगाव येथून गाडीने औरंगाबाद (संभाजीनगर) जिल्ह्यातील वैजापूरकडे रवाना होणार आहेत.तथापी, या संपुर्ण दौऱ्यात पूरग्रस्तांना दिलासा मिळणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा…

मुख्यमंत्री ‘महाराष्ट्रा’चे; कामाचा धडाका मात्र ‘ठाण्यात’ !

अमरावतीत कॉलरामुळे चिमुकलीचा मृत्यू

VIDEO : ईडीच्या दहशतीवरून काॅंग्रेस भडकली

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!