26 C
Mumbai
Friday, December 1, 2023
घरमहाराष्ट्रउर्फी सोबत महिला आयोगसुद्धा बेफाम झालाय का...; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

उर्फी सोबत महिला आयोगसुद्धा बेफाम झालाय का…; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

उर्फी जावेद  (Urfi javed) प्रकरणावर आज भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी राज्य महिला आयोगावर जोरदार हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या या उर्फीच्या सोबत महिला आयोगसुद्धा  (Maharashtra Women’s Commission) बेफाम झालाय का अशी म्हणायची परिस्थिती आज महाराष्ट्रातील महिलांवर आली आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. स्वैराचाराला लगाम घालणे ही सुद्धा आपली नैतिक जबाबदारी आहे. ती जबाबदारी तुम्ही विसरला आहे की काय त्याची आठवण करुन द्यायला मी आज पून्हा इकडे आली आहे. मला कोण काय बोलतय आणि कोण काय नाही बोलत याच्याकडे मी कधीच लक्ष दिले नाही, पण समाजात जर काय चुकीचे घडत असेल आणि जर ते सुधारायचे असेल तर कुणालातरी वाईटपणा घ्यावा लागतो आणि मला त्यासाठी कोण काय बोलतय याची मी कधीही परवा केली नाही, असे चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या. (Chitra Wagh said, Maharashtra Women’s Commission also become inattentive with Urfi javed)

चित्रा वाघ म्हणल्या, अधिकार पदावर बसलेल्या महिला म्हणत आहेत, कोणी काय कपडे परिधान करावेत हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. एखादा पेहराव ठराविक लोकांना अश्लिल वाटत असेल, तो इतरांना अश्लिल वाटत नसतो. त्यामुळे महिला आयोग अशा बाबतीत वेळ वाया घालवू शकत नाही. असे महाराष्ट्रन राज्याच्या महिला आयोगाने म्हटले आहे. महिला आयोगाचे काम हे महिलांचा सन्मान जपणे हे आहे आणि महिला आयोग म्हणतयं कोण काय कपडे घालतयं हे ज्याचं त्याने ठरवावे याच्यासाठी आम्ही वेळ वाया घालवणार नाही.

पुढे त्या म्हणाल्या, महिलांची इज्जत, महिलांची इभ्रत उघड्या नागड्या फिरणाऱ्या महिला यांना महिला आयोगाला जाब विचारावा वाटला नाही. कारण त्या म्हणत आहेत, आमचा वेळ आम्हाला वाया घालवायचा नाही. मग वेळ कशासाठी वाया घालवायचा आहे? ज्यावेळेला एखादी महिला अशापद्धतीने महाराष्ट्रातल्या मुंबईमध्ये उघडीनागडी फिरत असताना समाजमाध्यमांमध्ये हे व्हायरल होत असताना त्याची स्युमोटोमध्ये दखल का घेतली गेली नाही? आणि त्याच्यावर कारवाई का केली गेली नाही. सुनावण्या घेणे आणि केसेस सोडविणे हे तर तुमचे कामच आहे. पण ज्या पद्धतीत समाजमाध्यमांवर एवढीमोठी अश्लिल आणि घाणेरडे, ओंगळवाणे व्हिडीओ व्हायरल होत असताना त्याच्यावर दखल घ्यायला महिला आयोगाला वेळ नसेल तर मग महिला आयोगावर तीथे बसण्याचा सुद्धा कुणाला अधिकार नाही. हे सुद्धा मला सांगायचे असे चित्रा वाघ म्हणाल्या.

चित्रा वाघ म्हणाल्या, महिला आयोगाचे स्टेटमेंट मी तुम्हाला वाचून दाखवते, मला हा प्रश्न पडतो एकाच विषयात दुटप्पी भूमिका घेणारा महिला आयोग आहे, तो काय महिलांचा सन्मान राखणार आहे. त्यांचा कारनामा मी तुम्हाला सांगते, एक वेबसिरीज आली होती. त्या वेबसिरीजच्या पोस्टरवर अंगप्रदर्शनाबद्द्ल महिला आयोगाने नोटीस काढली होती. त्यात त्यांनी स्युमोटो ने दखल घेत त्यावेळी एका ट्विटरवर आलेल्या बातमीची दखल घेत अनुराधा वेबसिरीज आली होती त्याला त्यांनी लिहिले होते अभिनेत्री तेजस्विनी पंडीत आणि त्यांच्याबरोबर दिग्दर्शक संजय जाधव यांना त्यांनी नोटीस पाठवली होती.


नोटीसमध्ये म्हटले होते की, या पोस्टरमुळे समाजात धुम्रपान समर्थन आणि अंगप्रदर्शन असा चुकीचा संदेश जात असल्याने जनमाणसामधून समाजमाध्यमावर उमटत असलेल्या प्रतिक्रीया.. आता तुम्ही बघा पोस्टरवरची बाई तीच्यामुळे अंगप्रदर्शन होतय त्याच स्वागत आहे, जीथे चुकीचे होतय त्याच स्वागत आहे. पण इथे तर लाईव्ह सुरू आहे. आणि तो लाईव्ह शो मुंबईच्या रस्त्यावर चालू आहे. मग पोस्टरवर दखल घेणारं महिला आयोग ट्विटरची बातमी स्युमोटोमध्ये दखल घेणारे महिला आयोग मुंबई्च्या रस्त्यावर चालणाऱ्या नंगानाच याची दखल नाही का घेऊ शकत, असा सवाल चित्रा वाघ यांनी यावेळी केला.

आता म्हणत आहेत दिल्लीत दाद मागा आम्हाला जे करायचे ते आम्ही केलेलेच आहे, पण तुम्ही त्या ठिकाणी विराजमान आहात, तुम्हाला ज्या पक्षाने त्या ठिकणी बसवले आहे. आणि या केसेसमध्ये कारवाई करायला तुम्हाला कुणी रोकले, तुम्ही हात टेकले आहेत का ? असा सवाल चित्रा वाघ यांनी रुपाली चाकरणकर यांचे नाव न घेता केला. सल्लागार भारीच चुकीचे सल्ले देत आहेत, त्यामुळे वारंवार तोंडावर पडत आहेत. हे संविधानिक पद आहे, ती कोणती व्यक्ती नाही तर राज्याच मान सन्मान राखणारी एक ऑथॅरिटी आहे. त्यामुळे अशी ऑथेरीटी अशा बाष्कळपणामुळे तोंडावर पडत असेल तर ही राज्यासाठी देखील चांगली गोष्ट नाही, असे देखील चित्रा वाघ म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा

छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज नसते तर महाराष्ट्रात हिंदूच उरले नसते : देवेंद्र फडणवीस

उर्फी जावेदचे चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर; म्हणाली …म्हणून मला दोषी ठरवतात

‘शी… अरे..हे काय चाललयं मुंबईत, उत्तानपणे नंगटपणा; चित्रा वाघ उर्फी जावेदवर भडकल्या!

चित्रा वाघ म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणणे आहे की, ती मुस्लीम महिला आहे म्हणून चित्रा वाघ बोलत आहेत, पण येथे धर्माचा प्रश्नच नाही कारण दिवसभर चोवीस तास यांच्या डोक्यात हिंदू-मुस्लीम एवढेच आहे. जे पोटात असेत तेच ओठावर येते. कशापद्धतीने सामाजिक तेढ वाढेल, कशापद्धतीने विषय भरकटवला जाईल, यासाठी ते काम करतात. विषय धर्माचा नाही विषय नगंटपणाचा आहे. तो मुंबईच्या रस्त्यावर सुरू आहे. महिला आयोगाने तेजस्वीनी पंडितला नोटीस पाठवली, राजकीय भाषेत म्हणायचे झाले तर महाराष्ट्राची लेक तीला तात्काळ नोटीस पाठवली, कारण तीच्या अनुराधा वेबसिरीजच्या पोस्टरवरील अंगप्रदर्शनाने समाजमनावर विपरीत परिनाम होतो. पण उर्फीचा जो नंगानाच चालू आहे, त्याने समाजमनावर परिनाम होत नाही असे महिला आयोगाचे म्हणणे आहे. म्हणून तीला गोंजारायचे काम चालू आहे. तीच्यावर बोलायला महिला आयोगाला वेळ नाही, पण तेजस्वीनी पंडितला नोटीस पाठवली आहे. आता महिला आयोगाने उडी मारलीच आहे तर नुसते तरंगायचे काम करु नका हे प्रकरण कुठे काठाला लागतयं का बघा. आम्ही काय तुमच्यावर अवलंबून नाहीच आहोत, आम्ही आमचे काम करणारच आहोत.

चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या, या महाराष्ट्रात शिंदे-फडणवीसांचे सशक्त आणि सक्षम सरकार आहे. महिला आणि मुलींच्याबाबतीत सजग असणारे हे सरकार आहे. मला वाटते प्रत्येकाने पक्ष भेद बाजूला सारुन मी मागे देखील आवाहन केले होते, छत्रपतींचा आदर्श आणि साऊ माईचे संस्कार जपूया. नुसत्या सावित्रीमांईच्या जयंत्या साजऱ्या करुन आपण सक्षण आणि सशक्त नाही होणार. त्यासाठी अशा कृतीविरधात लढण्यासाठी एकत्र यायला हवे. मला वाईट वाटते तीला बोलायला खाद्य पुरविले जात आहे, वाह रे पुरोगामी! सगळं संपल आणि आता हे पून्हा सुरू झालं. तम्ही माझ्यावर कितीही टीका केली तरी मी थांबणार नाही, असे नंगेनाच थांबवण्यासाठी मी लढतच राहणार आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी