31 C
Mumbai
Saturday, December 14, 2024
Homeमहाराष्ट्रएस.टी. कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनामध्ये 6500 रुपयांची वाढ, CM एकनाथ शिंदे यांची घोषणा

एस.टी. कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनामध्ये 6500 रुपयांची वाढ, CM एकनाथ शिंदे यांची घोषणा

एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी संघटनांची बैठक झाली. (CM Eknath Shinde agrees to hike basic salary of ST employees)

राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये 6500  रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज याबाबत घोषणा केली आहे. या निर्णयाचे सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाचे अध्यक्ष गोपीचंद पडळकर आणि मुख्य कार्याध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी स्वागत करीत मुख्यमंत्र्यांचे आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले. (CM Eknath Shinde agrees to hike basic salary of ST employees)

जयंत पाटील यांचा सरकारवर निशाणा, जाहिरातबाजीवर ४०० कोटी; अन् शेतकऱ्यांना…

एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी संघटनांची बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल, अपर मुख्य सचिव विकास खारगे, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांच्यासह विविध कर्मचारी संघटनांचे प्रतिनीधी उपस्थित होते. (CM Eknath Shinde agrees to hike basic salary of ST employees)

संघटनांनी यावेळी केलेल्या वेतनवाढीच्या मागणीबाबत मधला मार्ग काढून एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याची भूमिका असल्याचे सांगत एप्रिल 2020 पासून कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनात ६५०० रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. त्याचबरोबर राज्यातील आगारांमध्ये चालक-वाहकांसाठी असणारी विश्रामगृहांची दुरवस्था दूर करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. चालक-वाहकांना चांगल्या सोयीसुविधा मिळायला पाहिजेत, असे सांगतानाच एसटीचा महसुल वाढीसाठी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. (CM Eknath Shinde agrees to hike basic salary of ST employees)

Shahajibapu Patil यांनी काहीही विकास केलेला नाही

एसटी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती बाबत विषयी चर्चा करताना राज्य शासनाने सर्वांसाठी महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना केली असून त्याच्याशी संलग्न योजना एसटी महामंडळाने करावी, त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना होईल, अशी सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. (CM Eknath Shinde agrees to hike basic salary of ST employees)

यावेळी आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य शासनाने भरगोस अशी वाढ केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कर्मचाऱ्यांना घेऊन हार घालून त्यांचा भव्य सत्कार केला. (CM Eknath Shinde agrees to hike basic salary of ST employees)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी