27 C
Mumbai
Tuesday, August 2, 2022
घरमहाराष्ट्रसणांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

सणांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

टीम लय भारी

मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रात कोरोना महामारीमुळे सर्वच सणांवर सरकारने नियम लादले होते. त्यामुळे जनतेला मागील दोन वर्ष हवे तसे सण साजरे करता आले नव्हते. पण यंदाच्या वर्षी मात्र महाराष्ट्रात पुन्हा एकदा धुमधडाक्यात सण साजरे करता येणार आहेत. याबाबतची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडून देण्यात आली आहे. सणांवरील सर्व निर्बंध काढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

काही दिवसांवर आलेला दही हंडी आणि गणपतीचा सण यंदाच्या वर्षी कोणत्याही निर्बंधांशिवाय साजरा करता येणार आहे. मागील राज्य सरकारने घरगुती आणि सार्वजनिक गणपतींच्या उंचीबाबत घालून दिलेले नियम या सरकारकडून काढून टाकण्यात आले आहेत. तसेच गणपतींच्या आगमनावेळी आणि विसर्जनावेळी नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, याकरिता रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे आदेश देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

मागच्या वर्षी गणेशोत्सवात काही मंडळांवर ध्वनी प्रदूषण आणि काही नियम मोडल्यामुळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. पण त्याबाबतचा नीट आढावा घेऊन आणि अभ्यास करून शक्य असतील त्यांच्यावरील गुन्हे देखील काढून टाकण्यात येतील, अशी महत्वपूर्ण घोषणा सुद्धा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मुंबईतील गणेशोत्सव पदाधिकारी आणि संघटना यांच्यासोबत बैठक घेतली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेवरून हे निर्णय घेण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेतून देण्यात आली.

दरम्यान, गणेशोत्सव मंडळांना गणपतीसाठी अनेक परवानग्या घ्याव्या लागतात. यासाठी त्यांना या संबंधीत कार्यालयांमध्ये सतत ये-जा करावी लागते. तरी सुद्धा बहुतेक मंडळांना परवानग्या मिळविताना दमछाक करावी लागते. याचमुळे मंडळांची ही धावपळ थांबविण्यासाठी राज्य सरकारने एक खिडकी योजना राबविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे मंडळांना गणेशोत्सवामध्ये परवानगी मिळविण्यासाठी फार धडपड करावी लागणार नाही.

हे सुद्धा वाचा :

दहीहंडी, गणेशोत्सवाबाबत नवे सरकार काय निर्णय घेणार?

शिवसेनेचा आणखी एक खासदार शिंदे गटात जाण्याची शक्यता

मोलमजुरी करुन ‘महापौर‘ झालेल्या तरुणाची घेतली राहूल गांधीनी दखल

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!