27 C
Mumbai
Thursday, August 4, 2022
घरमहाराष्ट्रEknath Shinde Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्ताराची लगीनघाई सुरू

Eknath Shinde Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्ताराची लगीनघाई सुरू

एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सरकार सत्तेत येवून एक महिना उलटला आहे. मंत्रीमंडळ विस्तार करण्याचा दबाव शिंदे सरकारवर वाढत चालला आहे. त्यामुळे न्यायालयाच्या संभाव्य निकालाची पर्वा न करता मंत्रीमंडळाचा विस्तार करण्याचा निर्णय एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असल्याचे समजते.

एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सरकार सत्तेत येवून एक महिना उलटला आहे. मंत्रीमंडळ विस्तार करण्याचा दबाव शिंदे सरकारवर वाढत चालला आहे. त्यामुळे न्यायालयाच्या संभाव्य निकालाची पर्वा न करता मंत्रीमंडळाचा विस्तार करण्याचा निर्णय एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असल्याचे समजते. येत्या रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पहिल्या टप्प्यात शिंदे गट व भाजप अशा दोन्ही पक्षांना ५०:५० या प्रमाणात मंत्रीपदे मिळतील, अशी शक्यता आहे. त्यानुसार दोन्ही गटांना प्रत्येकी आठ मंत्रीपदे मिळतील, असे बोलले जात आहे.

मंत्र्यांचा छोटेखाणी शपथविधी सोहळा राजभवनवर होईल. उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणून एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेल्या माजी मंत्र्यांना प्राधान्याने मंत्रीमंडळात स्थान दिले जाईल. यात अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे, उदय सामंत आदींचा समावेश असेल. भाजपच्या गटातून आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, राम शिंदे यांच्यासह काही नव्या चेहऱ्यांचाही समावेश असू शकेल असे बोलले जात आहे.

हे सुद्धा वाचा

Eknath Shinde : मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून निर्णय घेण्याचा वेग कायम

Shivsena : सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेमुळे एकनाथ शिंदेंची तिहेरी कोंडी, उद्धव ठाकरेंसाठी मात्र आशेचा किरण

Deepak Kesarkar : संत दीपक केसरकर ठाणे हृदयसम्राट एकनाथ शिंदेंना भेटले

एकनाथ शिंदे -भाजप सरकारमध्ये पहिल्या टप्प्यात भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे-पाटील, प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण, बबनराव लोणीकर, नितेश राणे आणि रवी राणा यांची या मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागू शकते. तर एकनाथ शिंदे गटातून दादा भुसे, उदय सामंत, दीपक केसरकर, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तर, संजय शिरसाठ आणि बच्चू कडू हे शपथ घेऊ शकतात, अशी सूत्रांकडून माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून ठाकरे गटाची कोंडी करण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांची शिवसेना ज्या मतदारसंघात कमकुवत आहे. तेथील शिंदे गटाच्या आमदारांना मंत्री पद देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. अशी शक्कल कदाचित एकनाथ शिंदे आणि भाजपकडून लढविली जाऊ शकते.

महत्वाची बाब म्हणजे या पहिल्या टप्प्यात उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शपथ घेणार नसल्याचे समोर येत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याआधी त्यांच्या वर्तुळातील चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर यांची मंत्री मंडळात वाणी लागेल.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!