26 C
Mumbai
Thursday, December 1, 2022
घरमहाराष्ट्रCM OSD : मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकारी यांना नक्षलवाद्यांकडून मिळाली धमकी

CM OSD : मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकारी यांना नक्षलवाद्यांकडून मिळाली धमकी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी डॉक्टर राहुल गेठे यांना नक्षलवाद्यांनी आपल्या निशाण्यावर ठेवल्याची माहिती समोर आली आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी डॉक्टर राहुल गेठे यांना नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक विकासकामे केलेली आहेत. आजही मुख्यमंत्री पदी असताना एकनाथ शिंदे यांची कामे त्याच पद्धतीने सुरु आहेत. त्यांच्या या विकासकामांमुळे गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी हे त्यांच्या जीवावर उठले आहेत. पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी (OSD) डॉक्टर राहुल गेठे यांना नक्षलवाद्यांनी आपल्या निशाण्यावर ठेवल्याची माहिती समोर आली आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी डॉक्टर राहुल गेठे यांना नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबतचे पत्र नक्षलवाद्यांकडून डॉक्टर राहुल गेठे यांना मिळाले आहे. गेल्या पाच वर्षांपासून डॉक्टर राहुल गेठे हे एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी आहेत.

डॉक्टर राहुल गेठे यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीतील विकासकामांची जबाबदारी सोपवली आहे आणि या कामांमध्ये अडथळा निर्माण करता यावा, यासाठी नक्षलवाद्यांकडून गेठे यांना हे पत्र देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी या जिल्ह्यात अनेक महत्वपूर्ण अशा विकासकामांना सुरुवात केली होती. तेव्हा देखील राहुल गेठे यांच्यावर एकनाथ शिंदे यांनी ती विकासकामे वेगाने पूर्ण करणयाची जबाबदारी दिलेली होती.

हे सुद्धा वाचा

CNG Crisis : पुढचे काही दिवस पुणेकरांना ‘सीएनजी’ नाही

Morbi bridge disaster : मोरबी पूल दुर्घटनेत कंपनीच्या अधिकाऱ्यांसह नऊ जणांना अटक

Rahul Gandhi सत्तेत आल्यास देशातील संस्था आरएसएस मुक्त करू; राहूल गांधी यांचे आश्वासन

दरम्यान, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा गडचिरोली जिल्ह्यातील विकासकामांना सुरुवात केली आहे. सध्या या जिल्ह्यात पुन्हा एकदा सुरजागडच्या खाणकामाला सुरुवात होणार असल्याची माहिती मिळत आहे. या खाणकामाला येथील स्थानिक नागरिकांसह नक्षलवाद्यांनी सुद्धा विरोध केला आहे. सुरजागड येथे खाणकाम होऊ नये याबाबतची भूमिका नक्षलवाद्यांनी कायमचं मंडळी. हे काम थांबविण्यासाठी त्यांनी जाळपोळ करत लॉईड कंपनीच्या व्हाईस प्रेसिडेंटची याठिकाणी हत्या देखील केली होती. ज्यामुळे सुरजागडचे खाणकाम बंद काही काळासाठी बंद करण्यात आले होते. पण आता पुन्हा एकदा हे काम सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

नेमकं काय लिहिले आहे पत्रात ?
जय लाल सलाम

जय किसान

डॅाक्टर राहुल गेठे को आखरी चेतावणी…

एकनाथ शिंदे का ॲाफिसर डॅाक्टर राहुल गेठे बहुत उड रहा है. हमारा नुकसान गडचिरोली मे बहुत कर रहा है. हम हमारे भाईयों का बदला जलद ही लेने वाले है. उसकी मौत का एलान निकल चुका है. महाराष्ट्र सरकार को उसकी जबाबदारी जितना लेना हे ले लो.

जय नक्षलवाद

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!