22 C
Mumbai
Saturday, December 10, 2022
घरमहाराष्ट्रCM Eknath Shinde : राज्यात पुन्हा घडणार राजकीय घडामोडी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

CM Eknath Shinde : राज्यात पुन्हा घडणार राजकीय घडामोडी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार गुवाहाटीला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा आपल्या सहकारी आमदारांसोबत गुवाहाटीला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. पुढील आठवड्यात त्यांचा हा दौरा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे पुन्हा एकदा आपल्या सहकारी आमदारांसोबत गुवाहाटीला (Guwahati) जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. पुढील आठवड्यात त्यांचा हा दौरा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने ते पुन्हा एकदा गुवाहाटीतील कामाख्या देवी मंदिराला भेट देणार आहेत. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर ते पहिल्यांदाच गुवाहाटीला जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा दौरा नीट पार पाडण्यासाठी युद्ध पातळीवर या दौऱ्याचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी एक विशेष टीम आधीच गुवाहाटीला पोहोचली आहे. या विशेष टीमकडून या दौऱ्याचे नियोजन करण्यात येत आहे. या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अनेकांची भेट घेनार असल्याचे देखील बोलले जात आहे. काही महिन्यांपूर्वी घडलेल्या राजकीय सत्तांतराचे महत्वाचे केंद्रस्थान बनले होते. याच गुवाहाटीमधून सत्तांतराच्या अनेक घडामोडींचे नियोजन केले गेले.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुढील आठवड्यात आपल्या 40 ते 50 आमदारांसोबत गुवाहाटीच्या दौऱ्याला जाणार आहेत. यावेळी ते कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहेत. तसेच त्याठिकाणी विशेष पूजेचे देखील आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचा दोन ते तीन दिवसांचा हा दौरा असणार आहे. या दौऱ्यामध्ये ते गुवाहाटीतील मंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्रात घडलेल्या सत्ता नाट्याचे गुवाहाटी हे केंद्रस्थान होते. शिवसेनेशी बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह असलेले 50 आमदार हे गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये अनेक दिवसांसाठी वास्तव्याला होते. यावेळी या सर्वांना गुवाहाटीतील भाजपच्या अनेक मंत्र्यांनी मदत केली होती. तसेच येथील राज्यपालांनी देखील त्यांची योग्य अशी व्यवस्था केली होती. ज्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुवाहाटीतील मुख्यंमत्री, राज्यपाल, मंत्री आणि पोलीस कमिश्नर यांची भेट घेणार आहेत. या दौऱ्याची तारीख निश्चित नसली तरी मुख्यमंत्री शिंदे हे आपल्या समर्थक आमदारांसह पुढील आठवड्यात हा दौरा करणार आहेत.

हे सुद्धा वाचा

Devendra Fadanvis : फडणवीस म्हणतात, येणाऱ्या लोकसभेला भाजप चमत्कार करेल!

Uddhav Thakeray : ‘मध्यवर्ती निवडणूकांसाठी तयार रहा!’ उद्धव ठाकरेंच्या विधानानंतर महाराष्ट्राचं राजकारण हादरलं

Sharad Pawar : निवडणुकीसाठी कामाला लागा; शरद पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन

दरम्यान, नुकतेच उद्धव ठाकरे यांनी राज्यात मध्यावधी निवडणूक लागणार असल्याचे वक्तव्य केले आहे. तसेच इतर पक्षांकडून देखील मध्यावधी निवडणुकांना दुजोरा देण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदे हे येणाऱ्या वादळापासून सावध होण्यासाठी देवीच्या दर्शनाला जात आहेत, असे बोलले जात आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या दौऱ्यात नेमके त्यांच्या गटातील किती आमदार सहभागी होतात, हे पाहावे लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटातील आमदार हे मंत्रीपद न मिळाल्याने आणि मंत्री मंडळाचा विस्तार लांबत असल्याने नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा दौरा चर्चेचा विषय बनलेला आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!