30 C
Mumbai
Wednesday, March 27, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कामाचा धडाका, एकही फाईल प्रलंबित नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कामाचा धडाका, एकही फाईल प्रलंबित नाही

टीम लय भारी

मुंबई : ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काम करीत नाहीत. ते मंत्रालयात येतच नाहीत’, अशा शब्दांत भाजपच्या नेत्यांकडून जोरदार प्रचार केला जातो. सोशल मीडियातील भाजपची मंडळी तर खालच्या थराला जावून ठाकरे यांच्यावर विखारी टीका करीत असते(CM Uddhav Thackeray’s work, no file is pending).

भाजपच्या या विखारी टीकेमध्ये फार तथ्यांश नसल्याचे समोर आले आहे. कारण फाईलींच्या निपटाऱ्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. गुरूवारपर्यंत ठाकरे यांच्याकडे आलेल्या जवळपास सगळ्या फाईली निकाली निघालेल्या होत्या(Uddhav Thackeray has done an admirable job in handling the files).

जो मंत्री अथवा IAS अधिकारी फाईलींचा वेगाने निपटारा करतो त्याला कार्यक्षम समजले जाते. मुख्यमंत्र्यांसमोर तर दररोज ढिगाऱ्यांनी फायली येत असतात. इतक्या मोठ्या संख्येने फाईली येऊन सुद्धा त्या जर वेळेत निकाली काढल्या जात असतील तर त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक करायला हवे, अशी भावना सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना व्यक्त केली.

मुख्यमंत्री कार्यालयात एका दिवसात कधी २५, तर कधी ५० आणि अगदी शंभर सुद्धा फायली येत असतात. विशेषतः मंगळवार, बुधवार व गुरूवार या तिन्ही दिवशी जवळपास सगळे मंत्री मंत्रालयात असतात. त्यामुळे या तीन दिवसांत विविध मंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांकडे येणाऱ्या फाईलींची संख्याही मोठी असते. उर्वरीत दिवशी फाईली कमी असतात, असे सूत्रांनी सांगितले.

फाईलच्या अंतिम मंजुरीसाठी स्वाक्षरी करण्याअगोदर मुख्यमंत्र्यांना ती फाईल समजून घ्यावी लागते. चुकीच्या फाईलवर स्वाक्षरी होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. इतके सगळे किचकट सोपस्कार पार पाडून सुद्धा मुख्यमंत्री फायलींचा वेगात निपटारा करतात.

हे सुद्धा वाचा

दुकानांच्या पाट्यांवर ‘मराठी’ होणार मोठी, इंग्रजी होणार छोटी; मंत्री सुभाष देसाईंचा दणकेबाज निर्णय

दारूच्या दुकानांना देव देवतांची, महापुरूषांची नावे देण्यास बंदी, महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra govt asks Centre to provide 50 lakh vials of Covishield, 40 lakh vials of Covaxin vaccines

मुख्यमंत्री कार्यालयात कार्यक्षम अधिकाऱ्यांची फळी

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या काळात महत्वाच्या अधिकारपदांवर अनेक खासगी व्यक्तींच्या नियुक्त्या केल्या होत्या. या खासगी व्यक्तींना सरकारी कामातील अनुभव नव्हता. या खासगी लोकांचे काम कमी अन् कामात ढवळाढवळ जास्त अशी स्थिती होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र आपल्या कार्यालयात खासगी व्यक्तींच्या बिल्कूल नियुक्त्या केलेल्या नाहीत. सरकारी सेवेतीलच अनुभवी व कार्यक्षम अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या ठाकरे यांनी आपल्या कार्यालयात केल्या आहेत. असे खमके अधिकारी दिमतीला असल्यामुळे ठाकरे यांना फायलींचा निपटारा वेगाने करणे शक्य होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ठाकरे यांचे उत्कृष्ट टीम वर्क

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचा स्वतःच्याच मंत्र्यांवर फार विश्वास नसायचा. सगळ्या मंत्र्यांचे अधिकार देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या हातात एकवटून घेतले होते. मुख्यमंत्री म्हणून फडणवीस हे फार अधिकार व स्वातंत्र्य देत नसल्याची खंत गेल्या सरकारमधील मंत्री खासगीमध्ये व्यक्त करायचे.

उद्धव ठाकरेंची कार्यपद्धत मात्र वेगळी आहे. हे सरकार तिन्ही पक्षांचे आहे. मात्र तिन्ही पक्षांतील मंत्र्यांसोबत ठाकरे यांचा उत्तम समन्वय आहे. मंत्र्यांचे अधिकार ओरबाडण्याचे प्रकार उद्धव ठाकरे करीत नाहीत(Uddhav Thackeray’s approach is different).

मुख्यमंत्री म्हणून स्वतःची जबाबदारी चोखपणे पार पाडायची, आणि अन्य मंत्र्यांच्या कामात कोलदांडा घालायचा नाही, अशी कार्यपद्धत ठाकरे यांची आहे. कामाचे योग्य नियोजन साधले जात असल्यामुळे वेळेतच फायलींचा निपटारा होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी