25 C
Mumbai
Thursday, December 1, 2022
घरमहाराष्ट्रCNG Crisis : पुढचे काही दिवस पुणेकरांना 'सीएनजी' नाही

CNG Crisis : पुढचे काही दिवस पुणेकरांना ‘सीएनजी’ नाही

पुण्यात 1 नोव्हेंबरपासून म्हणजेच आजपासून सीएनजी गॅस मिळणार नाही त्यामुळे सीएनजी वाहनधारकांच्या अडचणी वाढणार आहेत. मागण्या जो पर्यंत पुर्ण होत नाही तोपर्यंत तो पर्यंत टोरेंट सीएनजी पंपावरून सीएनजीची विक्री न करण्याचा निर्णयच पेट्रोल डीलर्स असोसिएशन कडून घेण्यात आला आहे.

महागाईने त्रस्त सर्वसामान्यांना पुन्हा एकदा फटका बसणार आहे. सीएनजीचे (CNG) पंप पुण्यातील ग्रामीण भागात अनिश्चित काळासाठी बंद राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पुण्यात (Pune) 1 नोव्हेंबरपासून म्हणजेच आजपासून सीएनजी गॅस मिळणार नाही त्यामुळे सीएनजी वाहनधारकांच्या अडचणी वाढणार आहेत. मागण्या जो पर्यंत पुर्ण होत नाही तोपर्यंत टोरेंट सीएनजी पंपावरून सीएनजीची विक्री न करण्याचा निर्णयच पेट्रोल डीलर्स असोसिएशन कडून घेण्यात आला आहे. असोसिएशनच्या या आक्रमक निर्णयामुळे अनेक सीएनजी धारकांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. आजपासून बेमुदत संपाची हाक देत असोसिएशनचे कर्मचाऱ्यांनी हा पवित्रा घेतला आहे, त्यामुळे यावर सरकार काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

एमओपीएनजी (MOPNG) याबाबत एक परिपत्रक जारी केले आहे त्यानुसार, व्यापार मार्जिन सुधारित मिळेपर्यंत आजपासून अनिश्चित काळासाठी पुणे ग्रामीण भागांतील टोरेंट सीएनजी पंपावरून सीएनजीची विक्री न करण्याचा निर्णय पेट्रोल डीलर्स असोसिएशनतर्फे घेण्यात आला असल्याचे त्यात म्हटले आहे. असोशियनच्या या निर्णयामुळे पुणेकरांच्या अडचणीत आणखीच भर पडणार आहे. त्यामुळे यावर योग्य तो तोडगा काढण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे सुद्धा सांगण्यात येत आहे.

Beauty Sleep : निवांत झोपेमुळे आता तुमची सुंदरता वाढणार! जाणून घ्या काय आहे ‘ब्युटी स्लीप’

UPI Payment Charges : आता ऑनलाईन पेमेंटवरही अधिकचे पैसे द्यावे लागणार? वाचा सविस्तर

Faltu Serial : स्टारप्लस ने आगामी मालिका ‘फालतू’चा नवीन प्रोमो केला प्रदर्शित

या निर्णयामुळे 1 नोव्हेंबरपासून म्हणजेच आजपासूनच सीएनजी पंप अनिश्चित काळासाठी बंद राहणार असून असोसिएशनचे कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत. दरम्यान जो पर्यंत मागण्या पुर्ण होत नाहीत तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा इशारा पेट्रोल डीलर्स असोसिएशनने दिला आहे. ड्यू पेमेंट आणि व्याजाची रक्कम डीलर्सच्या खात्यात जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत सीएनजी पंप उघडणार नाहीत, असे पेट्रोल डीलर्स असोसिएशनने यावेळी म्हटले आहे. त्यामुळे आजपासून पुण्यातील सीएनजी धारकांना सीएनजी मिळणार नाही.

सीएनजी न मिळाल्यामुळे पुण्याच्या वाहतूकीवर मोठा परिणाम होणार आहे त्यामुळे यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी पुणेकरांकडून मागणी करण्यात येत आहे, तर पुणे प्रशासनाकडून सुद्धा यावर प्रयत्न करण्यात येत आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पुण्यात महत्त्वाची बैठकही पार पडली. या बैठकीसाठी जिल्हाधिकारी राजेश देशमुख, एचपीसीचे कार्यकारी संचालक, आयओसी, बीपीसीएल आणि टोरेंट गॅस, पीडीए आणि जिल्हा पुरवठा अधिकारी उपस्थित होते. या बैठकीदरम्यान टोरंट सीएनजी पंप चालकांनी आपल्या मागण्या मांडल्या होत्या.

त्यामुळे या संपुर्ण प्रकरणी प्रशासनाकडून कोणती पावले उचलली जाणार हे पाहणेच आता महत्त्वाचे ठरणार आहे. जोपर्यंत या प्रकरणी तोडगा निघत नाही तोपर्यंत पुणेकरांना दैनंदिन अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!