28 C
Mumbai
Friday, September 22, 2023
घरमहाराष्ट्रवन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील नुकसीनीची भरपाई 30 दिवसात पीडितास ...

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील नुकसीनीची भरपाई 30 दिवसात पीडितास द्यावीच लागणार अन्यथा दंड; दोन्ही सभागृहात विधेयक मंजुर

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात अनेकजण जखमी होतात. काही जणांना कायमचे अपंगत्व येते. शिवाय त्यांना नुकसान भरपाईसाठी अनेकांचे उंबरठे झिजवावे लागतात. पण आता असे केल्यास दंड होणार आहे. याबाबतचे विधेयक आज दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे हल्ल्यात जखमी झालेल्यांची आशा पल्लवित होण्यास हरकत नाही. वन्यप्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात झालेल्या नुकसानीची भरपाई 30 दिवसात पीडितास न मिळाल्यास त्या रकमेवर व्याज देण्यात येईल आणि ते व्याज संबंधित अधिकाऱ्याकडून वसूल केले जाईल. या विषयातील विधेयक विधिमंडळातील दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे विधान परिषदेत हे विधेयक एकमताने मंजुर करण्यात आले. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने हे विधेयक मांडण्यात आले. या विधेयकावर बोलतांना वनमंत्री मुनगंटीवार यांनी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात झालेल्या नुकसानीच्या भरपाईत भरघोस वाढ करण्याचाही प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सांगितले. या विधेयकावर बोलतांना विधानसभा आणि विधान परिषदेत सर्वपक्षीय विविध सदस्यांनी चर्चेत भाग घेत विधायक सूचना मांडल्या, याबद्दल वनमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी समाधान व्यक्त केले. या सूचनांमधील अनेक गोष्टी विधेयकांच्या थेट कक्षेत येत नसल्याने आमदारांच्या सूचनांसंदर्भात एक व्यापक व विस्तृत बैठक अधिवेशन संपल्यानंतर लवकरच सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात येईल अशी घोषणाही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्य व पाळीव प्राण्यांची प्राणहानी होते तसेच गंभीर इजाही होते. त्याचप्रमाणे शेती, फळबागे तसेच घरांचे नुकसानही होते. या सर्व प्रकारच्या नुकसानीच्या व्याख्या करून त्यांची भारपाईची रक्कम भरघोस वाढविण्याकरता प्रस्ताव विचाराधीन आहे. मात्र जी काही नुकसान भरपाई पीडितास मिळते ती देखील 30 दिवसात मिळाली पाहिजे, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यास जबाबदार धरून भरपाईच्या रकमेवरचे व्याज त्याच्याकडून वसूल करून पिडितास देण्याची तरतूद आज मंजूर झालेल्या विधेयकात करण्यात आली आहे, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. विधान परिषदेत या विषयावर बोलतांना सुधीर मुनगंटीवार यांनी याविषयावर रचनात्मक सूचना केल्याबद्दल सर्व सदस्यांचे आभार मानले. ‘जंगल से जीवन के मंगल तक’ हे वन विभागाचे ध्येय असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. वने हे ऑक्सिजन देणारी देवाची देणगी आहे, तो काही राजकीय आखाडा नव्हे, याचे भान सर्वांनी आजवर राखले आहे, तसेच ते यापुढेही राखावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. स्थानिक विधानसभा सदस्यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरावर वन समित्या बनत आहेत, त्या समित्यांवर स्थानिक विधान परिषद सदस्यांना उपाध्यक्ष म्हणून घेण्यात येईल असेही सुधीर मुनगंटीवार यांनी जाहिर केले आहे.

हेसुद्धा वाचा
शिंदे सरकारचा सेवानिवृत्त पत्रकारांसाठी मोठा निर्णय; पेन्शनमध्ये होणार भरघोस वाढ
बीएमसीकडून मशीन वाटपाच्या कार्यक्रमावर कोट्यवधींचा खर्च; चौकशी करण्याची मागणी
त्र्यंबकेश्वर मंदिरातील परंपरा तपासून घ्या – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

जुन्नर येथे बिबट्या सफारी स्थापणार

विविध लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार जुन्नर येथे बिबट्या सफारी स्थापण्यात येईल अशी घोषणाही यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी केली. जुन्नर येथील या बिबट्या सफारीसाठी 80 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आल्याचेही त्यांना सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी