30 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeमहाराष्ट्रCongress: काँग्रेसचा प्रकाश आंबेडकरांना धक्का!‍

Congress: काँग्रेसचा प्रकाश आंबेडकरांना धक्का!‍

वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना आज एका मोठा धक्का बसला.

वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना आज एका मोठा धक्का बसला. वंचित बहुजन आघाडी आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) (AIMIM)पक्षातील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष (Congress) नाना पटोले यांच्या उपस्थितीत गांधी भवन येथील कार्यक्रमात काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेसमध्ये प्रदेश केलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये, वंचित बहुजन आघाडी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष शाकीर इंसालाल तांबोळी, सांगली जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे महासचिव उमर फारूक काकमरी, सातारा जिल्हा वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष फारूक अब्दुलरहमान पटणी, एमआयएमचे इस्लामपूर (जि सांगली) शहराध्यक्ष एजाज मुजावर, एमआयएमचे इस्लामपूर तालुकाध्यक्ष जाकिर मुजावर, वंचित बहुजन आघाडीचे नौशाद तांबोळी, मौला नदाफ, दिलावर तांबोळी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

हे सुद्धा वाचा –

Abdul Sattar : ‘…तुमची गाठ माझ्याशी आहे’, अब्दुल सत्तारांनी भरला दम’

Higher Education : ‘उच्च शिक्षणाची वाटचाल भांडवलशाहीकडे’

BMC Election 2022: उद्धव ठाकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला

Asia Cup 2022: खेळात चुक होणे ही स्वाभाविक गोष्ट; विराट कोहलीने केली अर्शदीप सिंहची पाठराखण

काँग्रेस पक्षात वंचित बहुजन आघाडी आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षातील कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा पूर्वीपासून सर्व जाती धर्मांच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. काँग्रेस पक्षच सर्व समाज घटकांना न्याय देऊ शकतो याचा विश्वास असल्यानेच आज एवढ्या मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. आम्ही सत्तेत असलो किंवा नसलो तरी लोकांच्या समस्या समजून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी कटिबद्ध आहोत.

जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करा व पक्ष संघटन बळकट करा असे आवाहन करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या सर्वांचे काँग्रेस पक्षाचे स्वागत केले.

अश्विन शेश्वरे
अश्विन शेश्वरेhttp://laybhari.in
He writes about National and Maharashtra Politics, Education, Health, Civic, Legal, Crime and Sports beat for LayBhari News.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी