32 C
Mumbai
Sunday, March 16, 2025
Homeमहाराष्ट्र7 ऑक्टोबर रोजी अंबाजोगाई येथे असीम सरोदे यांच्याशी संविधान संवाद

7 ऑक्टोबर रोजी अंबाजोगाई येथे असीम सरोदे यांच्याशी संविधान संवाद

हा कार्यक्रम 7 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजता अद्यकवी मुकुंदराज सभागृहात या संविधान संवादाचे आयोजन केले आहे. (Constitution Dialogue with Aseem Sarode at Ambajogai on 7th October)

काॅ. गंगाधरअप्पा बुरांडे प्रतिष्ठानच्या वतीने अंबाजोगाई येथे ज्येष्ठ विधितज्ञ एड. असीम सरोदे यांच्याशी संविधान संवाद आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम 7 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजता अद्यकवी मुकुंदराज सभागृहात या संविधान संवादाचे आयोजन केले आहे. (Constitution Dialogue with Aseem Sarode at Ambajogai on 7th October)

‘महाविकास आघाडी’ने आयाराम, गयारामांना उमेदवारी देवू नये, सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांची मागणी

शेतकरी, कामगार, कष्टकरी दीन-दलित सर्वहारा वर्गाच्या न्यायासाठी जीवन वेचणारे झुंजार स्वातंत्र सेनानी, बीड जिल्ह्याचे माजी खासदार, अखिल भारतीय किसान सभेचे राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ पत्रकार, संविधान कीर्तनकार ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर त्यांच्याशी ‘संविधानाची पायमल्ली होत आहे का?’ याविषयावर संवाद साधणार आहेत. (Constitution Dialogue with Aseem Sarode at Ambajogai on 7th October)

Jaykumar Gore | साड्या वाटपाचा पचका | Vidhansabha Election 2024

बदलत्या राजकीय, सामाजिक परिस्थितीत संविधानाची गळचेपी होत असल्याची चर्चा आहे. या परिस्थितीत समाजमन भक्कम करण्यासाठी एड. असीम सरोदे सातात्याने प्रयत्न करीत आहेत. त्यांच्याशी संवाद साधणारे ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर हे कीर्तन, व्याख्यान, प्रवचनातून संविधान जागृती करीत आहेत. 

भारतीय संविधानाला 75 वर्षे होत असताना या  दोन संविधान अभ्यासकांतील हा संवाद अंबाजोगाईकरासाठी एक पर्वणीच ठरणार आहे. तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन काॅ. गंगाधरअप्पा बुरांडे प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत आहे. (Constitution Dialogue with Aseem Sarode at Ambajogai on 7th October)

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी