29 C
Mumbai
Tuesday, August 2, 2022
घरमहाराष्ट्रनुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात सोलापूरमध्ये निदर्शने

नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात सोलापूरमध्ये निदर्शने

टीम लय भारी

सोलापूर : भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा (nupur sharma)  व नवीन जिंदाल यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळं सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. सोलापूरसह अहमदनगरमध्येही मुस्लिम बांधवांकडून आज बंदची हाक देण्यात आली आहे. नुपूर शर्मांच्या (nupur sharma)  अटकेच्या मागणीसाठी मुस्लिम बांधवांनी बंद पाळला आहे. यावेळी नुपूर शर्मांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. controversial statement nupur sharma arrest

सोलापुरात देखील एमआयएम पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.आखाती देशांमध्ये भारताविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. शर्मा यांच्यासह जिंदाल यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. केवळ महाराष्ट्रात नाही तर दिल्लीतील जामा मशिदीपासून ते प्रयागराजपर्तंय शर्मा यांच्या विरोधात जोरदार निदर्शने आणि घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या अटकेचीदेखील मागणी करण्यात आली.

हे सुद्धा वाचा: 

जर्मनीसोबतचे मैत्रिपूर्ण संबंध कायम राहतील : सुभाष देसाई

Historians concentrated only on Mughals, ignored Pandyas, Mauryas: Amit Shah

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!