29 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रNavab Malik : नवाब मलिकांच्या अडचणी वाढणार; वानखेडे प्रकरणात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल...

Navab Malik : नवाब मलिकांच्या अडचणी वाढणार; वानखेडे प्रकरणात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल होणार

वाशिम न्यायालयाने नवाब मलिक यांच्यावर अॅट्रोसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री नवा मलिक हे सध्या मनी लाँड्रिंगप्रकरणी तुरूंगात आहेत. आता त्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. वाब मलिक यांनी एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रावरून आरोप केले होते. त्यानंतर समीर वानखेडे यांचे चुलत भाऊ संजय वानखेडे यांनी वाशिम जिल्हा न्यायालयात नवाब मलिक यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी वाशिम न्यायालयाने नवाब मलिक यांच्यावर अॅट्रोसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. वाशिम शहर पोलिस ठाण्यात मलिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

समीर वानखेडे यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर असताना अनेक कारवाया केल्या होत्या. त्यांनी ड्रग्ज पार्टी प्रकरणी अभिनेता शहारूख खान याचा मुलगा आर्यन खान याला अटक केली होती. त्यानंतर नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांनी बनावट कारवाई केल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता. त्यामुळे हे प्रकरण तेव्हा चांगलेच तापले होते. समीर वानखेडे यांच्यावर मलिक यांनी अनेक आरोप केले. तसेच वानखेडे यांच्या जातीच्या दाखल्याबाबत देखील त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. अनेक कागदपत्रे त्यांनी त्यावेळी माध्यमांसमोर मांडत वानखेडे यांनी बनावट जातीचा दाखला बनवून नोकरी मिळविल्याचा देखील आरोप केला होता.
हे सुद्धा वाचा :

CM Eknath Shinde : नाशिक जिल्ह्यात शिंदे गटात पडणार फूट ?

Sushma Andhare : सुषमा अंधारेंनी सांगितले कधी कोसळणार शिंदे-फडणवीस सरकार!

Vinayak Mete Accident Case: सीआयडीकडून विनायक मेटे अपघात प्रकरणी चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा

त्यामुळे नवाब मलिक यांच्या रोजच्या आरोप आणि वेगवेगळ्या दाव्यांमुळे हे प्रकरण तेव्हा खुपच चर्चेत आले होते. त्यानंतर वानखेडे यांच्या पत्नी, त्यांचे वडिल यांनी देखील माध्यमांसमोर आपली बाजू मांडली होती. वानखेडे यांनी आपली बदनामी झाल्यामुळे 24 ऑगस्ट रोजी वाशिम न्यायालयात नवाब मलिक यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये वानखेडे यांच्या कुटुंबियांची बदनामी केल्याप्रकरणी नवाब मलिक यांच्यावर अॅट्रोसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायाधीश एच.एम. देशपांडे यांनी वाशिम पोलिसांना दिले आहेत. नोव्हेंबर 2021 मध्ये तक्रार पाठवूनही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. हे आरोप पाहता या प्रकरणाची चौकशी आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी