30 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रविदर्भात ‘तिबार पेरणी‘चे संकट

विदर्भात ‘तिबार पेरणी‘चे संकट

टीम लय भारी

वर्धाः यंदा राज्यातील शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत होता. मात्र दरवर्षी प्रमाणे पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर पावसाने सगळीकडे पाणीच पाणी झाले आणि उभी पिके पाण्यात गेली. सुरुवातीला पावसाच्या दडीमुळे तर नंतर सततच्या मुसळधार पावसामुळे उभ्या पिकांना चांगलाच फटका बसला.

पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला. यामुळे तूर, कपाशी, सोयाबीन पिकांचे व भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे.  शेतजमीन पाण्याखाली जाऊन जिल्ह्यातील 30, 54 टक्के पिकांचे पूर्ण नुकसान झाले. या अस्मानी संकटामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे.जिल्ह्यात तूर, सोयाबीन, कापूस आदी पिकांचे उत्पन्न शेतकरी घेतात. आतापर्यंत जिल्ह्यात 97, 62 टक्के म्हणजेच 4 लाख 2 हजार 119 हेक्टरवर विविध पिकांची लागवड झाली आहे.

पण जुलै महिन्यात 19 रोजीपर्यंत झालेल्या सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल 1 लाख 22 हजार 826, 7 हेक्टरवरील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे जून महिन्यात पाऊस लांबल्याने तब्बल चार हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली.  तर आता अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांवर तिबार पेरणी करावी लागणार आहे.

हे सुध्दा वाचा:

VIDEO : ईडीच्या चौकशी विरोधात काँग्रेसचे आंदोलन पेटले

सोनिया गांधीच्या चौकशीवर ‘यशवंत सिन्हां’नी केली टीका

मोलमजुरी करुन ‘महापौर‘ झालेल्या तरुणाची घेतली राहूल गांधीनी दखल

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी