‘दहीहंडी’ला खेळाचा दर्जा देणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.18 ऑगस्ट) केली. केवळ इतकंच नाही तर नोकऱ्यांमध्ये या खेळाडूंना पाच टक्के आरक्षण लागू करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे, शिवाय गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय सुद्धा राज्य सरकारने घेतला आहे. दहीहंडीच्या वेळेस कोणत्या गोविंदाचा मृत्यू झाल्यास त्याला 10 लाखांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली असून गंभीर जखमी झालेल्या गोविंदांसाठी 7.50 लाख रुपयांच्या मदतीची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये कोणाच्या हाता – पायाला गंभीर दुखापत होऊन जायबंदी झाल्यास 5 लाखांची मदत करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी घोषणेत सांगितले आहे.
हे सुद्धा वाचा
Ajit pawar : अजित पवारांची पुन्हा फटकेबाजी, सत्ताधारी बावचळले
Maharashtra Monsoon Session : काळ्या-पांढऱ्या दाढीवरून पावसाळी अधिवेशनात रंगली जुगलबंदी
Nashik Central Jail Attack : कैद्यांचा जीवघेणा हल्ला, पोलिसाचे फोडले डोके
राज्यात प्रो कबड्डी, खोखो प्रीमीअर सारख्या स्पर्धा होतात, त्याप्रमाणे आता प्रो गोविंदा स्पर्धा होणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. दहीहंडीचा उत्सव साजरा होत असताना लहान मोठ्यांपासून सगळेच गोविंदा यात सहभाग घेतात. कधीकधी मोठे मानवी मनोरे तयार करताना दुर्घटना होतात. यामध्ये कोणा गोविंदाचा मृत्यू होतो, तर कोणी जबर जखमी होतो. यानंतर त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी, अर्थसाहाय्य करण्यासाठी सुद्धा एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला असून याबाबतची मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक सहाय्याची योजना राबवण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहिहंडीला खेळाचा दर्जा दिल्याने गोविंदांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण दिसून येत असून यापुढे केवळ सणापुरतंच नाही तर इतर वेळेस सुद्धा दहीहंडीचा आस्वास सगळ्यांना घेता येणार आहे.