25 C
Mumbai
Thursday, September 7, 2023
घरमहाराष्ट्रदहिहंडीचा उत्साह सोशल मीडियावर; बाळगोपाळांची रिल्स व्हायरल 

दहिहंडीचा उत्साह सोशल मीडियावर; बाळगोपाळांची रिल्स व्हायरल 

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने घरोघरी पूजा संपन्न होत असताना डिजिटल युगातील आई-वडिलांनी लहान मुलांचे रिल्स तयार करण्यावर भर दिला. इंस्टाग्राम, फेसबुक तसेच व्हाट्सएप स्टेटसवर श्रीकृष्णाच्या पेहरावात लहान मुलामुलींचे फोटो आणि रिल्स दिवसभर सुरू होते. तसेच दहिहंडीच्या गाण्यांवरील लहान मुलांच्या नृत्यांचे रिल्स देखील मोठ्याप्रमाणात व्हायरल झाले.

गेल्या दोन वर्षांपासून नवजात शिशूंचे दर महिन्या गणित वाढदिवस साजरे करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. प्रत्येक महिन्यातील सणवाराला साजेसे फोटो अपलोड करण्याबाबत युट्युबवर बरेच चैनल उपलब्ध आहेत. श्रीकृष्ण जन्माष्टमी देशभरात धूमधडाक्यात साजरी केली जाते. पालकांनी लहान बालगोपाळांना श्रीकृष्णासारखी धोती, मुकुट आणि बासरी देत फोटोचा कार्यक्रम आटोपला.

फोटोसाठी एका ठिकाणी स्थिरवतील ती लहान मुले कसली, यासाठी पालकांनी त्यांच्या हाती खाऊ दिला. काहींनी तर चक्क लहान मुलांच्या हातात दह्याची वाटी ठेवली. आपला आवडता खाऊ फस्त करताना लहान मुलं दंग असताना पालकांनी त्यांचे फोटो सोशल मीडियावर रीलच्या माध्यमातून पोस्ट केले.

हे सुद्धा वाचा
दहीहंडीसोबत मुंबई, ठाण्यात पावसाचे आगमन!
जीआर घेऊन अर्जुन खोतकर यांनी घेतली जरांगेंची भेट, मात्र आंदोलन कायम
मला शाहरुखला भेटायचंही नव्हतं; गिरीजा ओक काय म्हणाली….

‘जोहे अलबेला मदनेनोवाला’, ‘राधे कृष्ण गोपाल कृष्ण’,’मधुबन मे जो कन्हैया’, ‘बासुरी ट्यून’ ही सर्व गाणी सोशल मीडिया वरती ट्रेंड होत होती. लहान मुलांसाठी खास लहान हंडी उभारून दहीहंडी साजरी करतानाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते. सलग दोन दिवस सोशल मीडियावर व्हिडिओचा ट्रेंड राहिला.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी