29 C
Mumbai
Wednesday, August 30, 2023
घरमहाराष्ट्रदहीहंडी उत्सव : गोविंदासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय !

दहीहंडी उत्सव : गोविंदासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय !

गोविंदा रे गोपाळा… म्हणत थरांवर थर चढत उचंच उंच दहीहंडी फोडण्याचा मराठमोळा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे, दहीहंडीसाठी गोविंदा दिवसरात्र सराव करत असतात. मात्र काही वेळा ऐन उत्सवात दहीहंडीसाठी थर रचताना दुर्घटना होऊन काही गोविंदाचा बळी देखील गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यासाठी राज्य सरकारने आता गोविंदासाठी मोठा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्यावर्षी दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याची घोषणा केली होती, तसेच राज्य सरकारच्या सरकारी नोकऱ्यांमध्ये 5 टक्के आरक्षण देण्याबाबत देखील त्यांनी घोषणा केली होती. आता दहीहंडी उत्सवातील गोविंदासाठी सरकारने विमा संरक्षण देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने गोविंदांसाठी १८ लाख ७५ हजारांची रक्कम विमा म्हणून मंजूर केली आहे. ही योजना ८ सप्टेंबर २०२३ पर्यंत लागू राहणार आहे.

दहीहंडी उत्सवात दुर्घटना होऊन जर कोणत्या गोविंदाचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तर जखमींना 5 लाख रुपये मदत मिळणार आहे. गोविंदाच्या विम्याची रक्कम राज्य सरकारकडून वर्ग देखील करण्यात आली आहे.
हे सुद्धा वाचा
ठाण्यातला असाही रक्षाबंधन तुम्ही पहिला का?
बाळासाहेब ठाकरे असते तर नितीन गडकरींना कडकडून मिठी मारली असती; अनिल गोटे नेमके काय म्हणालेत ? 
शरद पवारांच्या मदतीला उद्धव ठाकरे धावले !

गेल्यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेची घोषणा केली होती. गेल्यावर्षी सरकारने 50 हजार गोविंदाना विमा कवच दिले होते. यावर्षी ती संख्या वाढविण्यात आली असून आता ही संख्या 75 हजार करण्यात आली आहे.

 

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी