27 C
Mumbai
Friday, September 15, 2023
घरमहाराष्ट्रDattatray Bharne : माजी मंत्री दत्तात्रय भरणे गोरगरीबांसाठी बनले आरोग्यदूत !

Dattatray Bharne : माजी मंत्री दत्तात्रय भरणे गोरगरीबांसाठी बनले आरोग्यदूत !

कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठान व सुर्या हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच सणसर येथे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात जवळपास 350 रूग्णांनी आपल्या आरोग्याची तपासणी केली होती.

कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठान व सुर्या हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच सणसर येथे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात जवळपास 350 रूग्णांनी आपल्या आरोग्याची तपासणी केली होती. यामध्ये ज्या गरजू रूग्णांवर शस्त्रक्रिया करणे अत्यावश्यक आहे त्यांना टप्याटप्याने शस्त्रक्रियाची तारीख देण्यात येईल. आजपासून पुणे येथे मोफत शस्त्रक्रिया प्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत. यासाठी डॉ. चारुदत्त आपटे सर व सह्याद्री हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमचे विशेष सहकार्य आहे. मौजे. घोलपवडी (पवारवाडी) ता.इंदापूर येथील सौ.नंदा शिवाजी घोलप यांच्यावर आज सकाळी मोफत एन्जोप्लास्टी शस्त्रक्रिया सूर्या सह्याद्री हॉस्पिटल पुणे येथे करण्यात आली. यामुळे घोलप कुटुंबावरील २ लाख रुपयांच्या शस्त्रक्रियाचा भार हलका झाला आहे.

या ठिकाणी कै.भगवानराव भरणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिकेत भरणे व पुणे जिल्हा नियोजन समितीचे मा.सदस्य सचिन सपकळ यांनी सौ.घोलप यांची दवाखान्यात प्रत्यक्ष भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. इंदापूर तालुक्यातील इतर भागातील नागरिकांच्या आरोग्याचे महत्व लक्षात घेऊन लवकरच वेगवेगळ्या भागात आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात येणार आहेत. कै.भगवानराव भरणे प्रतिष्ठान‍चे अध्यक्ष अनिकेत भरणे आहेत. राज्यमंत्री दत्तात्रस भरणे यांच्या भार्गदर्शनाखाली भगवानराव प्रतिष्ठानकडून नेहमीच मोठया आपुलीने आणि हक्काने मदतीचा हात दिला जातो.

भगवानराव भरणे प्रतिष्ठानकडून नेहमीच सामाजिक‍, आरोग्य तसेच शैक्षणिक मदतीचे आयोजन केले जाते. रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. तसेच कोरोनाकाळात त्यांनी नागरिकांना भरघोस मदत केली. माजी राज्यमंत्री दत्तत्रय भरणे हे सोलापूरमध्ये  राजकारणाबरोबरच त्यांच्या सामाजिक कार्यासाठी देखील प्रसिदद्ध आहेत. त्यांच्या स्वभाव अतिषय विनोदी आहे. त्यात ते प्रमाणे मदतीला धावू येणारे आहेत. गेल्या दोन वर्षांत आलेल्या महापूरांमध्ये त्यांनी गरजूंना मदतीचा हात पुढे केला. दत्तात्रय भरणे हे एक राजकारणी आहेत.

हे सुद्धा वाचा

VIDEO : भविष्यातील जनउद्रेकाची नांदी, तरूण घुसला ईडीच्या दारी !

Jitendra Awhad : मोदी सरकारने गरीबांचे कंबरडे मोडले, डॉ. जितेंद्र आव्हाडांनी सोप्या शब्दांत सांगितले समजावून!

Ajit Pawar : मंत्रिमंडळ विस्तार करायला का घाबरता, तुमच्यात एकवाक्यता नाही का ? अजित पवारांचा सवाल

त्यांनी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम उपक्रम मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन या विभागांचे राज्य मंत्री पदे भूषवली आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी