पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानतर्फे गेल्या 26 वर्षांपासून दया पवार स्मृति पुरस्काराचे आयोजन केलं जात आहे. परंतू हा कार्यक्रम कधीच पुरस्कार वितरण आणि भाषणांपुरता मर्यादित ठेवला गेला नाही. प्रत्येक वर्षी वेगळ्या धाटणीचा सांस्कृतिक कार्यक्रम हे दया पवार स्मृति पुरस्कार समारंभाचे आकर्षण ठरले आहे. यंदा हा कार्यक्रम येत्या रविवारी, 20 ऑक्टोबर 2024 रोजी सायं. 5 वा. दादर-माटुंगा कल्चरल सेंटरला आयोजित करण्यात आला आहे. (Daya Pawar Memorial Award program)
आदित्य ठाकरे यांनी केली महायुतीची टीका, लाडक्या बहिणी योजनेबाबत केली मोठी घोषणा
या कार्यक्रमात संभाजी भगतचा शाहिरी जलसा असो वा गणेश चंदनशिवेयांचा गोधंळ-भारूड… भीमराव पांचाळे यांची गझल असो वा अक्षय शिंपीचा मोनोलॉग… सास्कृतिक चळवळीशी संबंधित परिसंवाद असो वा काव्य संमलेन…अंकुर तांगडे, नेहा ठोंबरे यांची स्टँड अप कॉमेडी असो वा विपीन ताटाड आणि माही जी यांचा रॅप…या सगळ्यांच्या परफॉर्मन्समुळे या कार्यक्रमाला चार चाँद लागले आहेत. याच सांस्कृतिक कार्यक्रमाच्या श्रुंखलेत यावेळी प्राची माया गजानन यांचा आदिवासी संगीत यात्रा. सप्रयोग व्याख्यान या प्रयोगाचे सादरीकरण होणार आहे. (Daya Pawar Memorial Award program)
विकास ठाकरे यांनी MSRTC च्या ७०,३७८ कोटींच्या करारावर घेतला आक्षेप
निसर्गाशी एकरूप होऊन जगणाऱ्या भारतातील आदिवासी समूहांच्या वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक परंपरांचा अविभाज्य घटक असणाऱ्या संगीत कलेचे संशोधन, दस्तऐवजीकरण आणि सादरीकरण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य अहमदाबाद येथील प्राध्यापिका प्राची माया गजानन यांनी केले आहे. (Daya Pawar Memorial Award program)
पुण्याच्या ललित कला केंद्रातून संगीत विषयातून एम. ए. करणाऱ्या प्राचीच्या या संशोधनामुळे आत्तापर्यंत केवळ मौखिक परंपरेने जतन केल्या जाणाऱ्या ठिकठिकाणच्या आदिवासी जमातीतील संगीत कला सूचिबद्ध होऊन पुढील पिढ्यांसाठी जतन करण्यात आली आहे. (Daya Pawar Memorial Award program)