31 C
Mumbai
Saturday, September 3, 2022
घरमहाराष्ट्रDeepak Kesarkar : दीपक केसरकर बच्चू कडूंची नाराजी दूर करणार

Deepak Kesarkar : दीपक केसरकर बच्चू कडूंची नाराजी दूर करणार

मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यातील विस्तारामध्ये बच्चू कडू आणि संजय शिरसाठ यांना स्थान न दिल्याने ते नाराज आहेत. आम्ही त्यांना भेटून त्यांची नाराजी दूर करु असे दीपक केसरकर म्हणाले.

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांचा महाराष्ट्र दौरा सुरु आहे. आज त्यांनी शिर्डी येथून दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी ते म्हणाले की, आपल्यावर जी जबाबदारी दिली आहे. ती आम्ही पुरी करु. आज पुण्यात छत्रपती उदयनराजे यांची ते भेट घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कॅबिनेट ही सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे ज्यांनी मंत्री पदाची शपथ घेतली आहे. ते सगळे जण कामाला लागले आहेत. राज्यात शिर्डी तसेच मुंबई सारख्या ठिकाणी जे पर्यटक येतात. त्यांच्या मागे दान मागण्यासाठी काही जण धावतात. यावर मंत्रीमंडळात निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मात्र एकनाथ शिंदे सरकारच्या पहिल्या फेरीतील मंत्रिमंडळात महिलांना स्थान मिळाले नसल्याची चर्चा सगळीकडे रंगली असून, दीपक केसरकर यांनी या विषयी वक्तव्य करणे टाळले. मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यातील विस्तारामध्ये बच्चू कडू आणि संजय शिरसाठ यांना स्थान न दिल्याने ते नाराज आहेत. आम्ही त्यांना भेटून त्यांची नाराजी दूर करु असे दीपक केसरकर म्हणाले. दीपक केसरकर म्हणाले की, पहिल्या फेरीत आमच्या गटाला ९ मंत्रीपदं आली. माझ्यात आणि भरत गोगावले यांच्यामध्ये त्यांनी माघार घेतली आणि मला संधी दिली.

ते म्हणाले की, मला पुढच्या वेळी संधी द्या. तुम्ही आता शपथ घ्या. त्यामुळे पुढच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात इतरांना संधी मिळेल. कुणीही नाराज होऊ नये असे दीपक केसरकर म्हणाले. शिंदे गटात इच्छूकांची संख्या वाढत असल्याने तसेच पहिल्या फेरीत मंत्रीपदी वर्णी न लागल्याने नाराज आमदारांची संख्या देखील वाढत आहे. शिंदे सरकारमधील ९ मंत्री शपथ बध्द झाले. त्यानंतर अनेक चर्चाना उधाण आले आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या अनेक शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न दीपक केसरकर यांनी केला. यावेळी त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आपला निर्णय बदलू शकतात असे भाकीत केले आहे.

हे सुद्धा वाचा

Rakshabandhan 2022 : रक्षाबंधनाच्या दिवशी ‘रक्षणकर्त्या’नेच गमावला जीव

Azadi ka Amrit Mahotsav : धनंजय मुंडे – डॉ. प्रीतम मुंडे येणार एकत्र!

Mumbai University : मुंबई विद्यापीठाचे निकाल रखडले, परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण!

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या विषयी बोलतांना दीपक केसरकर म्हणाले की, नीतीश कुमार यांनी आरजेडी बरोबर हाथ मिळवणी करुन सरकार बनवले आहे. मात्र ते आपला निर्णय बदलू शकतात. तसेच सुशिल मोदींनी देखील नितीश कुमार हे आपला कार्यकाळ पूरा करु शकणार नाहीत असे म्हटले आहे. हे वाक्य त्यांनी अत्यंत जबाबदारने उच्चारले आहे. नितीश कुमार हे सीनिअर लीडर आहेत. मात्र यावेळी त्यांनी चुकीच्या पक्षाला सोबत घेऊन सरकार स्थापन केले आहे.

नितीश कुमार यांनी आठ वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. नितीश कुमार यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की, मी ईडी आणि सीबीआयला घाबरत नाही. केंद्रीय तपास यंत्रणांचा चुकीचा वापर केला जात आहे. नीतीश कुमार यांचा कार्यकाळ 2025 मध्ये संपणार आहे. 15 ऑगस्टनंतर नितीश कुमार यांच्या सरकारमधील मंत्रीमंडळाचा पाटणा येथे शपथ विधी होईल. 24, 25 ऑगस्टला विधानसभेचे आधिवेश होईल.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी