29 C
Mumbai
Wednesday, August 3, 2022
घरमहाराष्ट्रदिपाली सय्यद यांनी 'टोचले' संजय राऊत यांचे कान

दिपाली सय्यद यांनी ‘टोचले’ संजय राऊत यांचे कान

टीम लय भारी

मुंबईः दिपाली सय्यद यांनी लवकरच एकनाथ शिंदे आणि फडणवीस एकत्र येतील असे व्टिट केले होते. त्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड गदारोळ माजला. जे ‘अशक्य ते शक्य‘ होईल असे? असा मानसिक संभ्रम सगळयांनच्याच मनात निर्माण झाला. कारण रोज सकाळी सकाळी शिवसेनेची भूमिका संजय राऊत प्रसार माध्यमांसमोर मांडता. मात्र जे दिपाली सय्यद यांना महित आहे. ते संजय राऊत यांना माहित नाही ? हा प्रश्न प्रसार माध्यमांना पडला. त्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे 2 दिवसांत चर्चा करतील असे विधान त्यांनी सोशल मीडियावर केली. मात्र संजय राऊतांना आपल्याला काहीच माहित नसल्याचे म्हटले आहे. त्या अतिशय लहान कार्यक-या आहेत, असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी केले.

आजच्या पत्रकार परिषदेत दिपाली सय्यद यांनी आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या. मी मनातली इच्छा (फिलींग) तुमच्या समोर ठेवली. पुर्ण शिवसेना एक आहे. मला तरी वाटतयं सर्वाना एकत्र यायचं आहे. मला जे जाणवले ते मी बोलले. शिवसेनेत दोन गट नकोत अशी माझी भावना. मी शिवसैनिक म्हणू मी लढा दिला आहे. मी आजपर्यंत मध्यस्थिती भूमीका घेतलेले. या वादामुळे छोटे छोटे शिवसैनिक होरपळत आहेत. एकत्र यायची हीच ती वेळ आहे. सगळयांनी एकत्र या बोललायला सुरुवात करा! यातच हित आहे! मला प्रत्येकाच्या बोलण्यात हे एकत्र यायचे जाणवले.

मानअपमान बाजूला ठेवून एकत्र या. बाळासाहेबांची शिवसेना एकत्र असावी. मातोश्रीचे दरवाजे सर्वांना उघडे आहेत. आदित्य ठाकरे देखील म्हणताहेत तुम्ही या. साहेबांनी बोलावले आहे. कुठे तरी कोणती तरी गोष्ट अडतेय. माझे दोन्ही ठिकाणी बालणे झाले. मला जाणवले ते मी बोलले. मला माझं कुटुंब तुटून नये असे माल वाटते. ‘इगो’ अडवा येतोय. मान अपमानत सगळं आडकलयं. एकमेकांना टोचून बोलत आहेत. त्यामुळे हे घडलयं.

संजय राऊत हे त्यांचे काम करतात . ते बिनधास्त बोलतात. त्यांना शिवसेनाला सर्पोर्ट करायचा असतो. संजय संजय राऊत यांनी थोडासा शांततेचा पवित्रा घ्यावा. मी सगळयांची माफी मागते. मला शिंदे साहेबांनी मला पक्षामध्ये आणले. माझी भूमीका शिवसेना एकत्र असावी अशी आहे. एकत्र येण्याने शिवसैनिकांना मोकळा श्वास घेता येईल. आतची या घडीला प्रत्येक पक्ष आपला विचार करतो. नैसर्गिक युती होत असेल ती, चांगल्यासाठी होत असेल तर ती करावी असे मत दिपाली सय्यद यांनी व्यक्त केले.

दिपाली सय्यद यांचा सल्ला संजय राऊत मानतील का? हाच प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. कोणाच्या बापाला न घाबरणारे संजय राऊत.’मोडेन पण वाकणार’ नाही म्हणणारे संजय राऊत ,खरंच दिपाली सय्यद यांचा सल्ला ऐकतील का? तसेच संजय राऊत यांनी केलेला अपमान बंडखोर नेते पोटात घालतील का? कारण राऊत यांनी बंडखोर आमदारांवर टोकाची टीका केली होती. तसेच आदित्य ठाकरेनी देखील शिवसेनेतील ‘घाण’ गेली अशी घणाघाती टीका केली होती. शिवाय शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे हे खरचं शरद पवारांना धोका देतील का? हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. या सगळया प्रश्नांची उत्तरे येणारा काळच ठरवेल हे मात्र खरे !

हे सुध्दा वाचा:

तुकाराम मुंडेंना मुंबई मनपाच्या आयुक्तपदी घेण्याची मागणी

नामांतरणाच्या मुद्द्याला भाजप-शिंदे सरकारने दिली मंजुरी

भाजप नेत्यानेच ‘मोदीभक्तां’ची केली चंपी

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!