‘जवान’चित्रपटाच्या सक्सेस पार्टीत अभिनेत्री दीपिका पदूकोनची सर्वात जास्त चर्चा होतेय. चित्रपटाची मुख्य अभिनेत्री नयनतारा पार्टीत गैरहजर राहिल्याने दीपिकानंच सगळा भाव खाल्ला. पठाणपाठोपाठ जवानमध्ये शाहरुख आणि दीपिकाचीच जोडी हिट ठरल्यानं आगामी डंकीमध्येही दीपिकाला घ्या, अशी मागणी सोशल मीडियावर होऊ लागली.
‘जवान’ चित्रपटात शाहरुखची दुहेरी भूमिका आहे. विक्रम आणि आझाद राठोड या पिता पुत्रांची शाहरुखनं भूमिका साकारली आहे. विक्रम राठोडच्या पत्नीची भूमिका दीपिकानं साकारली आहे. ऐश्वर्या राठोड असे या पात्राचे नाव आहे. ऐश्वर्या ही गृहिणी आहे परंतु स्वसंरक्षण करण्यास तत्पर आहे. सिनेमात काही कारणांमुळे ऐश्वर्याचा मृत्यू होतो. दीपिका या पात्रात चपलख बसते. दीपिकानं पाहुण्या कलाकाराची भूमिका केली असली तरीही सिनेमा संपल्यानंतरही ती लक्षात राहते.
हे सुद्धा वाचा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवडतात हे पदार्थ..
कोकणकरांना गणेशोत्सवाला गावी जाण्यासाठी भाजपची नमो एक्स्प्रेस धावली!
जेडीयू-आरजेडी युती तेल आणि पाण्यासारखी…असे का म्हणाले अमित शाह ?
त्याउलट नयनताराचा चित्रपटात जास्त वावर आहे. नयनतारा आणि शाहरुख खानच्या मारामारीचा प्रसंग लक्षात राहतो. नयनताराच्या अभिनयाबाबत शंका घेण्यात कुठेही वाव नाही मात्र नयनतारापेक्षाही दीपिकाचा प्रभाव जास्त लक्षात राहतो. सक्सेस पार्टीत दीपिका सर्वात जास्त सुंदर दिसत होती. शाहरुखसोबत ती सहज वावरत होती. शाहरुखनंही तिला आपला लकी मॉस्कोट असल्याचं जाहीर केलं. आता डंकी चित्रपट हिट करत हेट्रिक साजरी करण्यासाठी दीपिकाला घ्या, अशी नेटीझन्सनं शाहरुखकडे मागणी केली.