29 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रLakshman Hake News : 'शिवसेनेत गेलेले लक्ष्मण हाके सरकारी पदाचा मलिदा हडपताहेत,...

Lakshman Hake News : ‘शिवसेनेत गेलेले लक्ष्मण हाके सरकारी पदाचा मलिदा हडपताहेत, लवकर हकालपट्टी करा’

बोगस प्राध्यापक असलेल्या लक्ष्मण हाके यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. परंतु राज्य मागासवर्ग आयोगाच्या पदावर असताना देखील लक्ष्मण हाके यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे त्यांची आयोगाच्या पदावरून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी मागणी धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांच्याकडून पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे.

महाविकास आघाडीच्या काळात मंत्री असलेल्या विजय वडेट्टीवार यांनी बोगस प्राध्यापक असलेल्या लक्ष्मण हाके यांची राज्य मागासवर्ग आयोगावर नियुक्ती करून त्यांचे संरक्षण केले होते. परंतु महिन्याभरापूर्वी लक्ष्मण हाके यांनी विजय वडेट्टीवार यांच्यापासून लांब होऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे. आयोगाच्या पदावर असताना सुद्धा लक्ष्मण हाके यांनी थेट राजकीय काम सुरू केले असून त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे या प्रकरणी लक्ष्मण हाके यांची तातडीने हकालपट्टी करून आयोगाचे गांभीर्य जपावे, अशी मागणी धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी सुनील औंधकर,दिगंबर चव्हाण आदी उपस्थित होते.

यावेळी विक्रम ढोणे म्हणाले की, १५ जून २०२१ ला राज्य मागासवर्ग आयोग गठीत झाल्यापासून सदस्यांची पात्रता, आोबीसी डेटासंबंधी आम्ही वेळोवेळी भूमिका मांडली आहे. कोणतीही पात्रता पडताळणी न करता सदस्य नेमले गेले आहेत. लक्ष्मण हाके यांच्याकडे कोणतीही पात्रता नाही. त्यांनी चुकीची माहिती शासनाला देऊन तत्कालीन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून पद मिळवले होते.

लक्ष्मण हाके हे बोगस प्राध्यापक असल्याचे, तसेच त्यांनी पीएचडी बाबतची खोटी माहिती दिल्याची लेखी तक्रार केली असल्याचे विक्रम ढोणे यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र त्यात विजय वडेट्टीवार यांनी लक्ष्मण हाके यांचे संरक्षण केले. आता सत्ताबदल होताच हाके यांनी आयोगाच्या पदाचे नाव सांगून पोरखेळ करण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती विक्रम ढोणे यांनी यावेळी पत्रकार परिषदेत दिली.

घटनात्मक आयोगाचे लाभ घेत असतानाच शिवसेना पक्षात प्रवेश करून त्यांचा प्रसार करण्यास लक्ष्मण हाके यांनी सुरुवात केली आहे. आयोगाचे सदस्य म्हणून केला जात असलेला हा प्रकार कायद्याच्या विरोधातला आहे. त्याबरोबरच आयोगाच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणणारा आहे. त्यामुळे एकाचवेळी हाके हे आयोगाचे सदस्य आणि शिवसेनेच कार्यकर्ते कसे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे लक्ष्मण हाके यांच्या एकूण कारभाराची, तसेच राजकीय घडामोडींची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांच्याकडे केल्याचे विक्रम ढोणे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

Mumbai Railway Bridge : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई मनपाने धोकायदायक पुलांबाबत मुंबईकरांना केले आवाहन

Mumbai Metro 3 : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कुलाबा सिप्झ मेट्रो लाईन-3 ची यशस्वी चाचणी

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा दबदबा वाढला, मुंबई पोलिसांनी घेतले नमते

दरम्यान, राज्य मागासवर्ग आयोगाला निधी देणे, तसेच सक्षमीकरणासाठी यापूर्वी पुण्यात आंदोलन करण्यात आले होते. आता अपात्र सदस्यांना काढून टाकावे, शासनाची फसवणूक करणाऱ्या लक्ष्मण हाके यांच्यावर गुन्हा नोंदवावा, या मागणीसाठी गणेशोत्सवानंतर पुण्यातील आयोगासमोर आंदोलन करणार असल्याचे देखील यावेळी लक्ष्मण ढोणे यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी