34 C
Mumbai
Wednesday, November 30, 2022
घरमहाराष्ट्रDevendra Fadanvis : 'राजकारणातील कटुता दूर करायची असेल तर सर्वांना एक व्हावं...

Devendra Fadanvis : ‘राजकारणातील कटुता दूर करायची असेल तर सर्वांना एक व्हावं लागेल’; फडणवीसांचे सुचक विधान

संजय राऊतांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केला. शिवाय 'मी त्यांची भेट घेणार असल्याचे' विधानही केले. राऊतांच्या या विधानानिषयी प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीसांनी 'मी संजय राऊत हे काय बोलले, ते ऐकलं नाही. त्यामुळे मी त्यावर प्रतिक्रिया देणार नाही', असे म्हणत सध्या प्रतिक्रिया देणे टाळले.

शिवसेना खासदार संजय राऊत यांना बुधवारी (9 नोव्हेंबर) पत्राचाळ गैरव्यव्हार प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर त्यांनी गुरुवारी (10 नोव्हेंबर) मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. शिवाय दोघांनी मिळून एकत्रित पत्रकार परिषद देखील घेतली. त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी सत्ताधारी भाजपावर जोरदार निशाणा साधला. शिवाय ‘संजय राऊतांना खोट्या आरोपांखाली अडकवण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप करत न्याय देवतेने आम्हाला न्याय दिला असल्याचे’ विधानही केले. यावेळी बोलताना मात्र, संजय राऊतांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केला. शिवाय ‘मी त्यांची भेट घेणार असल्याचे’ विधानही केले. राऊतांच्या या विधानानिषयी प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीसांनी ‘मी संजय राऊत हे काय बोलले, ते ऐकलं नाही. त्यामुळे मी त्यावर प्रतिक्रिया देणार नाही’, असे म्हणत सध्या प्रतिक्रिया देणे टाळले.

तुम्ही संजय राऊत यांना भेटणार का, असा प्रश्नही फडणवीस यांना विचारण्यात आला. तेव्हा फडणवीसांनी सांगितले की, ‘मी सगळ्यांनाच भेटतो. त्यांनी भेट मागितली तर मी भेटेन. त्यामध्ये काही अडचण नाही. एवढंच की, राजकारणातील कटुता दूर करायची असेल तर सगळ्यांना मिळून ठरवावे लागेल. कुठलाही एक पक्ष ही कटुता दूर करू शकत नाही. पक्षाच्या नेत्यांनी शांत राहायचं आणि इतरांना बोलायला लावायचं, ही पद्धत बंद झाली पाहिजे. तरच राजकारणातील कटुता कमी होईल’, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले.

हे सुद्धा वाचा

Uddhav Thackeray : ‘त्याला पुन्हा एखाद्या खोट्या प्रकरणात गोवलं जाऊ शकतं’; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली भीती

Bank Strike : पुढच्या आठवड्यात बँकिंग सुविधा पडणार ठप्प! बँक कर्मचाऱ्यांचा संप

Bollywood Updates : एकता आणि रिया कपूर यांच्या आगामी ‘द क्रू’साठी तब्बू, करीना कपूर आणि क्रिती सेनन एकत्र

दरम्यान, संजय राऊत हे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारवर निशआणा साधतील असा अंदाज वर्वकला जात होता. मात्र, राऊत यांनी पहिल्या दिवशी तरी सरकारवर हल्लाबोल करणं टाळलं. तसंच शिवसेनेतील फुटीनंतर संजय राऊत ज्या भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका करत होते, त्याच फडणवीसांवर राऊत यांनी आता मात्र कौतुकांचा वर्षाव केला असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रात एक नवीन सरकार स्थापन झालं आहे. मी मागील तीन महिन्यांपासून तुरुंगात होतो. या सरकारने काही चांगले निर्णयही घेतले आहेत. मी त्यांचं स्वागतही करतो. फक्त विरोधासाठी विरोध आम्ही कधी करणार नाही. असं म्हणत संजय राऊत यांनी पहिल्या दिवशी सावध पवित्रा घेतल्याचे दिसत आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!