33 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
Homeमहाराष्ट्रमुंडे यांच्या निवासस्थानी जाऊन देवेंद्र फडणवीसांनी घेतली धनंजय मुंडेंची भेट

मुंडे यांच्या निवासस्थानी जाऊन देवेंद्र फडणवीसांनी घेतली धनंजय मुंडेंची भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी धनंजय मुंडे  (Dhananjay Munde) यांच्या कारला परळीमध्ये मंगळवारी(दि.3) रात्री अपघात झाला होता. यामध्ये मुंडे यांच्या छातीला आणि डोक्याला मार लागला. या अपघातात मुंडेंच्या कारचंही मोठं नुकसान झालं. सध्या त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी मुंडे यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. दरम्यान आज उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुंडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या पूर्वी मुंडे रुग्णालयात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पंकजा मुंडे यांंनी रुग्णालयात जावून मुंडे यांची भेट घेतली होती.(Devendra Fadnavis met Dhananjay Munde)

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांचे पक्ष वेगळे असले तरी दोघांचे वैयक्तिक संबंध मात्र चांगले राहिले आहेत. मुंडे भाजपमध्ये असताना फडणवीस आणि त्यांच्यात मैत्रीचे नाते होते. हे नाते आज देखील कायम असल्याचे या भेटीतून दिसून आले. मुंडे फडणवीस यांच्या या भेटीचे काही फोटो आणि व्हिडिओही समोर आले आहेत. यामध्ये देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची चौकशी करताना दिसत आहेत.

हे सुद्धा वाचा :‘टाटा मॅरेथॉन’मध्ये धनंजय मुंडेंच्या पीएंची यशस्वी दौड !

सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांची ब्रिच कॅन्डी रुग्णालयात घेतली भेट

बनावट कामगार नेत्यांचे कंबरडे मोडा; देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश

‘मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतताना रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास धनंजय मुंडे यांच्या वाहनास परळी शहरात वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने  अपघात झाला आहे. साहेबांच्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे,’ अशी माहिती मुंडे यांच्या ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आली होती.

व्यक्त केली कृतज्ञता
धनंजय मुंडे यांनी डिस्चार्जनंतर प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले, मी रुग्णालयात असताना राजकीय, सामाजिक, अध्यात्मिक, पत्रकारिता सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी व माझ्या सर्व सहकाऱ्यांनी माझी काळजी व्यक्त करत विचारपूस केली. त्या सर्वांचे तसेच रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी