31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रDevendra Fadnavis : माझा एक फोन आणि बच्चु कडू गुवाहाटीत; फडणविसांनी सांगितली...

Devendra Fadnavis : माझा एक फोन आणि बच्चु कडू गुवाहाटीत; फडणविसांनी सांगितली अंदरकी बात!

बच्चु कडू हे गुवाहाटीला कसे गेले ही अंदरकी बात आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सर्वांसमोर खुली केली आहे. देवेंद्र फडणीस यांना पत्रकार परिषदेत याबाबत त्यांना विचारले असता फडणवीस म्हणाले, मी फोन केल्यामुळे बच्चु कडू गुवाहाटीला गेले. त्यांनी कोणताही सौदा केला नसल्याचे ते यावेळी म्हणाले.

आमदार बच्चु कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातील वादात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केल्यानंतर आता हा वाद निवळण्याची चिन्हे आहेत. रवी राणा यांनी बच्चु कडू पैसे घेऊन गुवाहाटीला गेल्याचा आरोप केला होता. त्याआधी देखील विरोधकांनी ’50 ओके एकदम ओके’ अशी टीका फुटलेल्या आमदारांवर केली होती. दरम्यान बच्चु कडू हे गुवाहाटीला कसे गेले ही अंदरकी बात आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सर्वांसमोर खुली केली आहे. देवेंद्र फडणीस यांना पत्रकार परिषदेत याबाबत त्यांना विचारले असता फडणवीस म्हणाले, मी फोन केल्यामुळे बच्चु कडू गुवाहाटीला गेले. त्यांनी कोणताही सौदा केला नसल्याचे ते यावेळी म्हणाले.

पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस म्हणाले, मी बच्चु कडू यांना फोन केला आणि आम्हाला सरकार स्थापन करण्यासाठी तुम्ही आमच्यासोबत हवे आहात असे सांगितले, या माझ्या एका फोनवर बच्चु कडू गुवाहाटीला गेले, यासाठी बच्चु कडू यांनी कोणताही सौदा केला नव्हता असे देखील फडणवीस यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस म्हणाले, बच्चु कडू यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप करणे चुकीचे आहे. ते केवळ माझ्या एका फोनवर गुवाहाटीला गेले होते. इतर आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्यासोबत गेले होते. यावेळी आमदारांवर अपात्रतेची कारवाई होईल अशी देखील भीती होती. असे असताना देखील आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवत ते त्यांच्यासोबत राहीले असे देखील यावेळी फडणवीस म्हणाले.

दरम्यान रवी राणा आणि बच्चु कडू यांच्या वादावर बोलताना फडणवीस म्हणाले. राणा आणि बच्चु कडू यांना दोघांनाही चर्चेसाठी बोलवले होते. दोघांनीही चुक कबुल करत, आपले शब्द मागे घेतले असून दोन्ही आमदार आता विकासाच्या मुद्द्यावर काम करणार आहेत, आमच्यासाठी हा वादाचा विषय आता संपलेला आहे.

हे सुद्धा वाचा :

Mumbai Crime : गोरेगावातील मनसे पर्यावरण सेनेच्या सचिवावर प्राणघातक हल्ला

रवी राणा ‘वर्षा’वर भेटले, बच्चु कडूंबाबतच्या वक्तव्यावर दिलगिरी; बच्चु कडूंची भूमिका काय?

Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची तब्येत खालावली! मुंबईतील ब्रीज कँडी रुग्णालयात दाखल

– राणा यांनी चुक कबूल केली, बच्चु कडू यांनी मानले शिंदे फडणवीस यांचे आभार
रवी राणा आणि बच्चु कडू यांचा 50 खोक्यांवरून पेटलेला वाद अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीमुळे मिटला आहे. दोन्ही आमदारांनी आपल्या चुका मान्य केल्या आहेत. रवी राणा यांनी बच्चु कडू यांच्या विरोधात केलेली विधाने मागे घत असल्याचे सांगितल्या नंतर बच्चु कडू यांनी देखील मुख्यंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत, तसेच कार्यकर्त्यांशी बैठक घेऊन पुढील भुमिका घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी