29 C
Mumbai
Wednesday, August 3, 2022
घरमहाराष्ट्रचंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याबाबत देवेंद्र फडणवीसांनी केली सारवासारव

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याबाबत देवेंद्र फडणवीसांनी केली सारवासारव

टीम लय भारी

पनवेल : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची पनवेल येथे भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर सारवासारव (Devendra Fadnavis summarized Chandrakant Patil’s statement) करत आपले मत व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आपले नेते आहेत, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

मनावर दगड ठेऊन एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आले, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून करण्यात आले. यानंतर अनेकांकडून अनेक तर्कवितर्क लावण्यात आले. तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्यामुळे देवेंद्र फडणवीस नाराज असल्याचे सुद्धा बोलले गेले. पण चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिवसभर रंगलेल्या चर्चांना आवर घालण्याचे काम केले आहे.

‘एकनाथ शिंदे हे आपले नेते आहेत. आपल्या सर्वांचे नेते शिंदे आहेत. मगाशी चंद्रकांत दादा म्हणाले त्यावर वेगळे अर्थ काढले. आम्ही सर्व प्रक्रियेत एक होतो. माध्यमांचे काम असते. हे सरकार अडीच वर्षे पूर्ण करेल पण पुढे देखील येईल.’ असे पनवेल येथील भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत सांगण्यात आले. तसेच वरिष्ठांच्या सांगण्यावरूनच मी सुद्धा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, अन्यथा मी सुद्धा सरकारबाहेर राहून काम करण्याचा निर्णय घेतला होता, असेही फडणवीसांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा :

तडजोड ही करावीच लागणार – उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उडाली झोप

‘भाजपला एकनाथ शिंदे नकोसे’

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!