30 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रDevi : परदेशातही आहेत देवीची शक्तीपीठे

Devi : परदेशातही आहेत देवीची शक्तीपीठे

शारदीय नवरात्रोत्सवाला (Devi) सुरूवात झाली आहे. नवरात्र म्हणजे शक्तीची पूजा करण्याचे नऊ दिवस. नवरात्रीमध्ये दुर्गादेवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. भारतामध्ये देवीची एकूण 51 शक्तीपीठे आहेत.

शारदीय नवरात्रोत्सवाला (Devi) सुरूवात झाली आहे. नवरात्र म्हणजे शक्तीची पूजा करण्याचे नऊ दिवस. नवरात्रीमध्ये दुर्गादेवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. भारतामध्ये देवीची एकूण 51 शक्तीपीठे आहेत. दरवर्षी अश्वीन महिन्यात या ठिकाणी शक्तीची पूजा केली जाते. सगळयाच शक्तीपीठांमध्ये लाखोंच्या संख्येने भक्त हजेरी लावतात. महाराष्ट्रात देखील देवीची साडेतीन शक्तीपीठे आहेत. ही साडेतीनपीठे म्हणजे ॐ काराचे सगुणरुप आहेत. ॐ कारामध्ये साडेतीन मात्रा आहेत. ‘अ’ कार पीठ हे माहूर गडावर आहे. तर ‘उ’कार पीठ तुळजापूरला आहे. ‘म’ कारपीठ हे कोल्हापूरला आणि ऊर्धमात्रा सप्तशृंगी देवी नाशिकमध्ये आहे. काश्मीर, कांची आणि कामाख्या ही साडेतीनपीठे म्हणजे ॐ काराचे सगुणरुप आहेत.ॐ कारामध्ये साडेतीन मात्रा आहेत. ‘अ’ कार पीठ हे माहूर गडावर आहे. तर ‘उ’कार पीठ तुळजापूरला आहे. ‘म’ कारपीठ हे कोल्हापूरला आणि ऊर्धमात्रा सप्तशृंगी देवी नाशिकमध्ये आहे. ही महाराष्ट्रातली साडेतीन शक्तीपीठे आहेत. तर दुसरी 51 शक्तीपीठे भारत आणि भारता बाहेर आहेत.

PM : पाकिस्तानात जन्मलेले भारताचे पंतप्रधान

Dahiwadi News : युपीएससी, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी डाॅ. नितीन वाघमोडेंच्या खास टिप्स

Sonia Gandhi : सोन‍िया गांधींची डोकेदुखी वाढली

देवीची 51 शक्तीपीठे :-

हिंगलाज हे देवीचे शक्तीपीठ पाकिस्तानमध्ये आहे. साखर माता हे शक्तीपीठ देखील पाकिस्तानमधील काराची येथे आहे. सुक्कर स्टेशनच्या जवळ आहे. तिलाच नयना देवी असेही म्हणतात. सुगंधा-सुनंदा हे देवीचे शक्तीपीठ हे बांग्लदेशमधील शिकारपूर मधील बारिसालमध्ये आहे. काश्मीरी महामाया हे शक्तीपीठ जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाव येथे आहे. ज्वालामुखी स‍िद्दीदा हे शक्तीपीठ हिमाचल प्रदेशमधील कांगडा येथे आहे. जालंधर त्रिपुरमालिनी हे पंजाबमधील जालंधर येथे आहे. जयदुर्गा हे झारखंडमध्ये आहे.

नेपाळमध्ये महामाय गुजयेश्वरी मंद‍िर हे पशुपतीनाथ पासूनजवळ आहे. या देवीला महाशिरा या नावाने देखील ओळखले जाते. मानस दाक्षायणी हे शक्तीपीठ तिबेटमध्ये आहे. कैलास मानसरोवरच्या जवळ आहे. विरला हे ओर‍िसामध्ये आहे. गंडकी नदीच्या किनाऱ्यावर पोरखा देवी तसेच पश्चिम बंगालमध्ये चंडीका अजेया नदीच्या किनाऱ्यावर हे मंद‍िर आहे. पश्चिम बंगालमध्ये उज्जय‍िनी देवीचे मंदीर आहे. त्रिपूरा राज्यात त्रिपुरासुंदरीचे मंद‍िर माताबारी पर्वत शिखरावर आहे. तसेच चटृल भवनी बांगलादेशमधील चितगावमध्ये आहे.

बंगालमध्ये भ्रामरी, आसामध्ये कामाख्या, प्रयागमध्ये ललिता, युगाद्य भूतधात्री बंगलामध्ये वर्धमान जिल्हायात आहे. बांगला देशात जयंती, कोलाकता येथे कालिपीठ, प.बंगालमध्ये किरीट विमला, वाराणसीमध्ये विशलाक्षीचे मंद‍िर मणकिर्णीका घाटावर आहे. कन्याश्रम, हरियाणामध्ये सावित्री, दिल्लीमध्ये मणिदेवी, श्रीशैलम बंगलादेश, प. बंगालमध्ये कांची, मध्यप्रदेशमध्ये कलामाधव, मध्यप्रदेश अमरकंटक येथे शोनाक्षीदेवी. उत्तर प्रदेशच्या चित्रकुट येथे शिवानी, वृंदावनातील भुतेश्वर , तर तामिळनाडूमध्ये शुच‍ी-नारायणी, पंचसागरी, बांगला देशमध्ये अपर्णा, लडाखमध्ये श्रीसुंदरी, प. बंगाल‍मध्ये कपालिनी. गुजरातमध्ये प्रभास चंद्रभागा ही देवीची शक्तीपीठे आहेत.

तसेच उज्जैनजवळ श‍िप्रा नदी किनारी अवंती, नाशिक येथे भ्रामरी, आंध्रप्रदेश येथे राजमुंद्री, बंगामध्ये रत्नावली. भारतातील नेपाळ सीमेवर उमा, प. बंगालमध्ये न्हाटीदेवी, कर्नाटकमध्ये जयदुर्गा, प.बंगालमध्ये महिषासुरमर्दीनी, बंगालादेशमध्ये यशोरेश्वरी प.बंगामध्ये फुलारा, प.बंगालमधील नंदीपूरची देवी, श्रीलंकेमध्ये इंद्राक्षी देवीची मंद‍िरे अशी देवीची 51 शक्तीपीठे आहेत. सर्वांत जास्त देवीची मंद‍िरे ही पश्चीम बंगाल आणि बांग्लादेशामध्ये आहेत. 42 शक्तीपीठे ही भारतामध्ये आहेत. बाकीची भारता बाहेर आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी