महाराष्ट्र

Samata Pratishthan : डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, नागपूर या संस्थेच्या अनियमिततेची चौकशी करण्याचे धनंजय मुंडे यांचे निर्देश

गेल्या तीन वर्षात दिलेल्या निधीचा हिशोब असमाधानकारक

टीम लय भारी

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सामाजिक न्याय विभागांतर्गत २०१७ साली स्थापन करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, नागपूर (Samata Pratishthan) या संस्थेच्या कारभारात प्रचंड अनियमितता आढळल्याने याबाबतची चौकशी करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.

या संस्थेच्या संचालक मंडळाची आज मंत्रालयात ना. मुंडेंच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली.

सदर बैठकी दरम्यान सन २०१८-१९ चा लेखापरीक्षण अहवाल संचालक मंडळापुढे ठेवण्यात आला होता. TACS & कंपनी या सनदी लेखापाल संस्थेने केलेल्या लेखापरीक्षण ( २०१८-१९ ) मध्ये संचालक मंडळाने यामध्ये असलेल्या त्रुटींचे निरीक्षण नोंदवले.

सदर संस्थेला मागील ३ वर्षात दिलेल्या रुपये १६ कोटी रुपये खर्चाचा हिशोब समाधानकारक नसल्याचे सनदी लेखापाल यांच्या अहवालात दिसून आले. यामध्ये निविदा प्रक्रिया न राबविता कामे देणे अथवा निविदा प्रक्रिया चुकीची राबविणे, खर्चाच्या देयकांवर संबंधीताच्या स्वाक्षऱ्या नसणे किंवा त्यासोबतचे व्हाऊचर न ठेवणे, खर्चाचा मेळ न लागणे, सनदी लेखापाल यांना आवश्यक ती कागदपत्रे उपलब्ध करुन न देणे या बाबी बाबतचे सनदी लेखापाल यांचे निष्कर्ष समोर आल्याने ना. मुंडे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.

सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे ठरवून, प्रधान सचिव, सामाजिक न्याय यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात यावी व सदर चौकशी समितीमध्ये आयुक्त, समाज कल्याण, पुणे व महासंचालक, बार्टी यांचा समावेश करावा. तसेच सदर समितीने एक महिन्यात चौकशी अहवाल दिल्यानंतर तो पुढील संचालक मंडळाच्या बैठकीत ठेवण्यात येऊन त्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

आजच्या या संचालक मंडळाच्या बैठकीस राज्यमंत्री विश्वजीत कदम विभागाचे सचिव श्याम तागडे, आयुक्त प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये उपसचिव दिनेश डिंगळे उपस्थित होते.

अभिषेक सावंत

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

19 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

20 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

21 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

21 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

21 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

23 hours ago