33 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रमहामंडळांच्या भागभांडवलात मोठी वाढ करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी होणार :  धनंजय मुंडे

महामंडळांच्या भागभांडवलात मोठी वाढ करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी होणार :  धनंजय मुंडे

टीम लय भारी

मुंबई:  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारी असलेल्या महामंडळांच्या भाग भांडवलात राज्य मंत्री मंडळाच्या झालेल्या बैठकीत मोठी वाढ करण्यात आली असून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांच्या पाठपुराव्यास मोठे यश आले. आता या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. Dhananjay munde on decision in cabinet meeting

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची भागभांडवल मर्यादा पूर्वी 500 कोटी होती, ती वाढवून 1000 कोटी करण्यात आली आहे. त्याचबरोबर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या भागभांडवलाची मर्यादा 300 कोटींवरून 1000 कोटी करण्यात आली आहे, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाची मर्यादा पूर्वी 73.21 कोटी कोटी, ती देखील वाढवून 1000 कोटी करण्यात आली; तसेच महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाची भागभांडवल मर्यादा 50 कोटींवरून 500 कोटी करण्यात आली आहे.

संबंधीत महामंडळाच्या भागभांडवल वाढीसाठी आमच्या विनंतीवरून राज्य सरकारने भरभरून निधी दिला असून. अतिरिक्त निधी टप्याटप्याने महामंडळांना वितरित करण्यात येईल. या महामंडळांच्या माध्यमातून राज्यातील प्रत्यक्ष लाभ मिळणाऱ्या गरजू लाभार्थींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असून, त्यांना थेट लाभ मिळाल्याने त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार असल्याचा विशेष आनंद असल्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांसह महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले आहेत.

हे सुद्धा वाचा :

विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पुन्हा पत्ता कट !

Gold smuggling case: Kerala CM Pinarayi Vijayan rebuts prime accused Swapna Suresh’s allegations of his involvement

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी