28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रधनंजय मुंडेंना कौतुक वंचितांच्या मुलांच्या कामगिरीचे !

धनंजय मुंडेंना कौतुक वंचितांच्या मुलांच्या कामगिरीचे !

पुणे : यावर्षी दहावीच्या निकालामध्ये शासकीय निवासी शाळेमधील मागासवर्गीय मुलांनी चांगलीच बाजी मारली आहे. राज्यात कार्यरत असलेल्या 90 निवासी शाळांपैकी 77 निवासी शाळांचा निकाल हा 100 टक्के लागला आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंचे सर्व स्तरावतून कौतुक केले जात आहे.

समाज कल्याण विभागामार्फत चालवलल्या जाणाऱ्या नव्वद निवासी शाळांपैकी 77 निवासी शाळांचा निकाला 100 टक्के लागला आहे. 6 शाळांचा निकाल 95 टक्के लागला आहे. तर 4 शाळांचा निकाल 90 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांच्या लक्षणीय कामगिरीबद्दल समाजातील सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडेंनी देखील विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

समाजकल्याण विभागाचे आयुक्त डाॅ. प्रशांत नारनवरे यांनी देखील विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच गुणवत्ता वाढवण्यासाठी अधिक प्रयत्न करण्यात येणार असून, लवकरच या निवासी शाळांमध्ये सी.बी.एस.सी. अभ्यासक्रम लागू करण्यात येणार असल्याचेही सांगितले.

उत्कृष्ट कामगिरीबद्दल राज्यातील सर्व निवासी शाळांचे समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री डाॅ. विश्वजीत कदम, सचिव सुमंत भांगे, आयुक्त डाॅ. प्रशांत नारनवरे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे तसेच शाळांचे, मुख्याध्यापकांचे, शिक्षक, कर्मचारी यांचे देखील अभिनंदन केले आहे.

हे सुद्धा पहा :

यंदा आयटीआय प्रवेशासाठी दीड लाख जागा उपलब्ध

अबब ! मंत्री बाळासाहेब पाटील यांचा ‘गाढव’छाप कारभार; राष्ट्रवादीच्या नेत्यानेच उघडे पाडले पितळ

उच्च अधिकाऱ्याची दृष्टी अधू; धनादेश होताहेत बाऊन्स, आदेशांवर चुकीच्या स्वाक्षऱ्या; तरीही खुर्ची सोडवेना

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी