30.4 C
Mumbai
Saturday, January 28, 2023
घरमहाराष्ट्रपोलीस भरतीचे अर्ज भरताना वारंवार सर्व्हर डाऊन; धनंजय मुंडे, राजेंद्र पातोडे यांची...

पोलीस भरतीचे अर्ज भरताना वारंवार सर्व्हर डाऊन; धनंजय मुंडे, राजेंद्र पातोडे यांची अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याची मागणी

गेली कित्तेक दिवस रखडेली पोलीस भरती प्रक्रीया सुरू झाली असून त्यासाठी पोलीस शिपाई, चालक अशा पदांकरिता सुमारे 18000 पदांसाठी अर्ज भरण्यासाठी 30 नोव्हेंबर ही अंतिम मुदत आहे. त्यामुळे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरु असताना वेबसाईट हॅँग होणे, सर्व्हर डाऊन होणे अशा समस्या येत आहेत.

गेली कित्तेक दिवस रखडेली पोलीस भरती प्रक्रीया सुरू झाली असून त्यासाठी पोलीस शिपाई, चालक अशा पदांकरिता सुमारे 18000 पदांसाठी अर्ज भरण्यासाठी 30 नोव्हेंबर ही अंतिम मुदत आहे. त्यामुळे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरु असताना वेबसाईट हॅँग होणे, सर्व्हर डाऊन होणे अशा समस्या येत आहेत. अर्ज भरण्यासाठी आता काही तासांचाच अवधी राहिल्यामुळे उमेदवारांची तारांबळ उडत असून, अनेक उमेदवार भरतीपासून वंचित राहू शकतात अशी भीती उमेदवारांकडून व्यक्त केली जात आहे, त्यामुळे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार धनंजय मुंडे आणि वंचित बहूजन युवा आघाडीचे वतीने प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

आमदार धनंजय मुंडे यांनी ट्विट केले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, याआधी देखील पोलीस भरतीचे नोटिफिकेशन निघाल्यानंतर नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र कोणत्या वर्षीचे सादर करावे यावरून उमेदवारांमध्ये बराच संभ्रम निर्माण झाला होता. आता एजन्सीच्या चुकीमुळे पोलीस भरती प्रक्रियेसाठीची वेबसाईट सतत हँग होणे किंवा सर्वर डाऊन असणे या बाबी सतत समोर येत असल्याचेही धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे. त्यामुळे प्रक्रियेची मुदत 30 नोव्हेंबर पासून पुढे पंधरा दिवसांसाठी वाढविण्यात यावी, तसेच ऑनलाइन अर्ज प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी तात्काळ दूर कराव्यात अशी मागणी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

तर राजेंद्र पातोडे यांनी म्हटले आहे की, राज्यात पोलिस शिपाईच्या १८ हजार पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र अखेरच्या दिवस जवळ आलेला असताना मोठ्या प्रमाणात ऑनलाईन अर्ज भरल्या जात नसल्याच्या तक्रारी येत आहेत. फॉर्म रजिस्टर न होणे, पैसे भरले न जाणे, सबमिट न होणे अशा अडचणी येत आहेत. रात्री उशिरापर्यंत अनेकांनी प्रयत्न केले परंतु त्यांना अर्ज भरता आलेले नाहीत.
हे सुद्धा वाचा :

नरेंद्र मोदींचा २०२४ मध्ये पराभव अटळ (माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा विशेष लेख)

Kirit Somayya : किरीट सोमय्या स्वत:च्या बालेकिल्ल्यातच भाजपकडून बेदखल!

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांची घोषणा; आसाममध्ये महाराष्ट्र भवन उभारणार!

अशावेळी वयोमर्यादा ओलांडलेल्या आणि शेवटची संधी असलेल्या उमेदवारांचे मोठे नुकसान होणार आहे. सरकारने तात्काळ ह्याची दखल घेवून फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घ्यावा. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेत ही भरती सुरू झाली आहे, अशावेळी जाचक अटी टाकून आणि बंधने लादून सरकारने बेरोजगार तरुण तरुणीच्या भवितव्याचा खेळ खंडोबा सुरू केला आहे. त्यात आता ऑनलाईन अडवणूक केली जात आहे. त्यासाठी वंचित युवा आघाडी त्वरित मुदतवाढ निर्णय घेण्याची मागणी मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना ई मेल द्वारे राजेंद्र पातोडे केली आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!