29 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रDhananjay Munde : धनंजय मुंडे धावले अडचणीत आलेल्यांच्या मदतीसाठी

Dhananjay Munde : धनंजय मुंडे धावले अडचणीत आलेल्यांच्या मदतीसाठी

सामान्य लोकांची लाडकी लालपरी गेल्या अनेक वर्षांपासून संकटात सापडली आहे. राज्यात अनेक सरकार आले आणि गेले. मात्र तिची व्यथा कायम राहिली. आता एक नवीन संकट एसटीवर येऊन ठेपले आहे.

सामान्य लोकांची लाडकी लालपरी गेल्या अनेक वर्षांपासून संकटात सापडली आहे. राज्यात अनेक सरकार आले आणि गेले. मात्र तिची व्यथा कायम राहिली. आता एक नवीन संकट एसटीवर येऊन ठेपले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संप काळात राज्य परिवहन महामंडळाने बससेवा सुरू रहावी यासाठी 800 कंत्राटी कामगार घेतले होते. हे कंत्राटी कामगार आता कामावरुन काढून टाकण्यात येत असून, या सर्व कंत्राटी चालकांना राज्य शासनाने सवेत सामावून घ्यावे अशी मागणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी व्टीटव्दारे केली आहे. ज्या लोकांनी एसटी बंद होऊ नये म्हणून रात्रंदिवस काम केले त्यांना आता वाऱ्यावर सोडणे योग्य नाही.

अचानक रोजगार गेल्याने त्यांच्या कुटुंबावर आता उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. या अन्यायाबाबत काही कंत्राटी चालकांनी धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडे निवेदन देखील दिले आहे. या निवेदनामध्ये त्यांनी पालघर, रायगड, स‍िंधुदुर्ग, ठाणे, नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा या विभाग नियंत्रकांना तसे निवेदन देण्यात आले आहे. एसटी महामंडळाचा संप दीर्घ काळ चालला होता. 22 एप्र‍िलपासून कर्मचारी कामावर रुजू झाले.त्यानंतर कंत्राटी कामगारांना काम कमी झाले.

हे सुद्धा वाचा

Marathi people : ‘मराठी माणसांना गाडा, अनं मॉल उभे करा’

Governor : ‘ठाकरे सरकारची 12 आमदारांची यादी रद्द करणे ही संवैधानिक चूक’

Rahul Gandhi : ‘त्या’ एका चुकीच्या शब्दासाठी भाजपने राहूल गांधींची शाळा घेतली

त्यामुळे महामंडळाकडून कंत्राटी कामगारांचा खूप कमी वापर होतो आहे. त्यामुळे वरील नमुद केलेल्या विभागांकडून 3 सप्टेंबर पासून कंत्राटी कामगारांच्या वापरावर बंदी घालण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. संपकाळात मदतीसाठी धावून आलेल्या त्या 800 कंत्राटी कामगारांना शासकीय सेवेत रुजू करुन घ्या अशी विनंती माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ‍‍ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय रद्द करण्याचा शिंदे-फडणवीस सरकारने सपाटा लावला आहे. हे या गोष्टीवरुन स्पष्ट झाले आहे.

Dhananjay Munde : धनंजय मुंडे धावले अडचणीत आलेल्यांच्या मदतीसाठी

ज्या लोकांनी एसटी बंद होऊ नये म्हणून दिवस रात्र काम केले. आता त्यांना वाऱ्यावर सोडणे योग्य नाी. अचानक रोजगार गेल्याने त्यांच्या व त्यांच्या कुटुंबावर आता उपासमाराची वेळ येऊ शकते. या अन्यायाबाबत काही कंत्राटी चालकांनी धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडे निवेदन देखील दिले आहे. त्यानंतर धनंजय मुंडेंनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्टीटरवर मागणी केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी