28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रधनंजय मुंडे परळी शहराचे भाग्यविधाता - बाजीराव धर्माधिकारी

धनंजय मुंडे परळी शहराचे भाग्यविधाता – बाजीराव धर्माधिकारी

टीम लय भारी

परळी: माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा आज वाढदिवस होता. त्यामुळे त्यांच्या हितचिंतकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. प्रत्येक चाहत्याने आपल्या आवडीनुसार धनंजय मुंडे साहेबांना शुभेच्छा दिल्या. बाजीराव धर्माधिकारी यांनी धनंजय मुंडेच्या कार्याचे कौतुक केले. धनंजय मुंडे साहेब. परळी शहराचे भाग्यविधाते आहेत आशा शब्दात त्यांनी गौरव केला. आज वाढदिवसानिमित्ताने धनंजय मुंडेंनी परळीसाठी केलेल्या कामांचा आढावा घेतला आहे.

बाजीराव धर्माधिकारी म्हणतात, गेल्या अनेक वर्षांपासून धनंजय मुंडेच्या नेतृत्वात आम्ही सर्व सवंगडी काम करतो. अत्यंत कमी वयात व अल्पसंख्यांक समाजातील असून, सुध्दा साहेबांनी मला नगरअध्यक्ष होण्याची संधी दिली. सर्व जाती धर्माच्या लोकांना समानतेची आणि प्रेमाची वागणूक दिली. धनंजय मुंडेच्या नेतृत्वात मागील 10 वर्षे नगर परिषदेमध्ये एकहाती सत्ता आहे. घनशी नदीवर साखळी बंधारे बांधून साहेबांनी ‘नाथ जलपॅटर्न’ राबवला. आज पाणी ओसंडून वाहत आहे. विविध प्रभागांमध्ये उभारलेल्या उदयानांमध्ये आज गर्दी होतांना दिसत आहे. त्यांनी वाचनालय सुरु केले. वैधनाथ ज्योतिर्लिंग विकासाचा आराखडा सत्यात उतरला.

धनंजय मुंडे परळी शहराचे भाग्यविधाता - बाजीराव धर्माधिकारी

सौर उर्जेच्या वापरावर त्यांनी भर दिला. त्यांनी प्रत्येकजाती धर्माच्या लोकांसाठी स्वतंत्र सभागृह  उभारले. प्रत्येक महापुरुषांची जयंती पुण्यतिथी, सण, उत्सव अभिनव पध्दतीने साजरे करतात. मुंडे साहेबांची लोकप्रियता दिवसागणीक वाढत आहे. भांडगावचा त्यांनी कायापालट केला. छत्रपती संभाजी महाराजांचे महानाटय, कवी संमेलन, दिवाळी पहाट, कव्वाली गायन, भीम गितांचे कार्यक्रम, नाटकांचे प्रयोग, महोत्सव, दुर्गोत्सव, ईद मिलाद असे अनेक सांस्कृत कार्यक्रम धनंजय मुंडे आयोजित करतात. घरकूल योजना, निराधारांना आर्थिक मदत केली. बारामतीच्या धर्तीवर परळी शहर 100 टक्के झोपडपट्टी मुक्त करण्याचा त्यांनी निर्धार केला आहे.परळी शहर बायपासचे काम पूर्णत्त्वाकडे जात आहे.

परळी ते अंबाजोगाई रस्ता, परळी, धर्मापुरी, परळी ते चांदापूर मार्गे पानगाव परळी ते सिरसाळा या रस्त्यांची कामे सुरु झाली.  परळी शहराला पाणी पुरवठा करणारे वाण धरण गाळमुक्त केले. टोकवाडी येथे जलकुंभ उभारण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला. नव्याने 11 लघु-मध्यम प्रकल्पांना मान्यता मिळाली. परळी शहराला गटारमुक्त करण्याकडे त्यांचा भर आहे. गिरवली येथे एक वीजेचे सबस्टेशन उभारण्याचा संकल्प केला आहे.

रस्ते, नाले, वीज, पाणी म्हणजे केवळ स्मार्ट सिटी नव्हे, तर परळी शहरातील प्रत्येक कुटुंबात समृध्दी आणि आर्थिक स्थैर्य यावे, त्यासाठी पुरक असलेल्या सुविधा निर्माण करणे, हिच ध्येयपूर्ती आहे. त्यांनी सेवाधर्म हा उपक्रम राबवला. धनंजय मुंडेनी कोविडच्या काळात परळीकरांना मोठी मदत केली. नव-उदयोग निर्मिती तसेच छोटया उदयोगांना चालना देवून सर्वसामान्य जनतेला दिलासा दिला आहे. रेल्वे ओव्हरब्रिजला समांतर ब्रिज उभारुन रहदारी कमी करण्याचा त्यांचा संकल्प आहे. अशा प्रकारे धनंजय मुंडे हे केवळ परळीकरांसाठी झटतांना दिसून येत आहेत. त्यामुळे ते परळीकरांचे भाग्यविधात आहेत.

हे सुध्दा वाचा:

सैनिक आपसात का भिडताहेत?

आता सभागृहात ‘हे‘ शब्द बोलण्यास बंदी

‘ये पब्लिक है ये सब जानती है’, जितेंद्र आव्हाड इंधन दराच्या निर्णयावर गरजले

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी