34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रधनंजय मुंडे यांच्या मागणीला मोठे यश; दोन्ही उड्डाणपुलांच्या चौपदरीकरण कामासाठी निधी मंजूर

धनंजय मुंडे यांच्या मागणीला मोठे यश; दोन्ही उड्डाणपुलांच्या चौपदरीकरण कामासाठी निधी मंजूर

टीम लय भारी 

परळी : परळी शहरात वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जाणारा श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूल आणि थर्मल परिसरातील दुसऱ्या उड्डाणपुलाच्या चौपदरीकरण कामासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 100 कोटी मंजूर केले आहेत. माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या या मागणीला यश आले असून केंद्राकडून लवकरच याबाबत निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

धनंजय मुंडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची 16 जून रोजी भेट घेत परळी शहराच्या रहदारीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणाऱ्या दोन्ही उड्डाणपुलाच्या चौपदरीकरणासाठीच्या निधीची मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर अंबाजोगाई लातूर रोडवरील बीड जिल्हा हद्दीतील रस्ताच्या चौपदरीकरणाची सुद्धा मागणी करण्यात आली होती. दरम्यान या या मागणीला सुद्धा मंजूरी देत त्याबाबतचा प्रस्ताव सुद्धा केंद्राने मागवला आहे.

धनंजय मुंडे यांच्या मागणीला मोठे यश; दोन्ही उड्डाणपुलांच्या चौपदरीकरण कामासाठी निधी मंजूर

निधी मंजूर करण्यात आलेल्या कामांमध्ये रा.मा.548 ब वरील श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूल चौपदरीकरण व रा.मा.361 एफ वरील परळी शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक ते औष्णिक विद्युत प्रकल्पाचे प्रवेशद्वार या रस्त्याचे त्यावरील रेल्वे उड्डाण पुलासह चौपदरीकरण करणे ही दोन कामे समाविष्ट करण्यात आली असून यासाठी 100 कोटी तात्काळ मंजूर करण्यात आले आहेत.

या दोन्ही कामांची लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याने परळीकरांना यामुळे दिलासा मिळणार आहे. आपल्या मागणीला यश आल्यामुळे आमदार मुंडे यांनी समस्त परळी वासीयांच्या वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत.

माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी 16 जून रोजी मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन यासंदर्भात मागणी केली होती. परळी शहरातील दोन्ही रेल्वे उड्डाणपूल हे रहदारीच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाचे असून, अनेक वर्षांपासून हे उड्डाणपूल विस्ताराच्या प्रतीक्षेत होते, असे मुंडे यांनी मागणीत म्हटले होते.

दरम्यान, उड्डाणपुलांच्या चौपदरीकरणाच्या मागणीसोबतच अंबाजोगाई ते लातूर रस्त्यातील वाघाळा पूल ते लातूर जिल्हा हद्द या 14 किलोमीटर रस्त्याचे काँक्रीट चौपदरीकरण करण्याची मागणी देखील मान्य करण्यात आली असून, केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने याबाबतचा 100 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश विभागाला दिले आहेत.

धनंजय मुंडे यांनी नितीन गडकरी यांच्या भेटीत या पुलाचे वाहतुकीच्या दृष्टीने असलेले महत्व अधोरेखित करत, चौपदरी विस्तार करण्याची तसेच अंबाजोगाई लातूर रस्ता विस्तारित करण्याची मागणी केली होती, त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील अन्य काही राष्ट्रीय महामार्ग व पुलांच्या विस्तार व दुरुस्तीचीही मागणी केली होती. त्या अन्य मागण्यांना देखील टप्प्याटप्प्याने या आर्थिक वर्षात निधी उपलब्ध होणार असल्याचे मंत्री गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

हे सुद्धा वाचा…

मोठी बातमी : देवेंद्र फडणविसांच्या मर्जीतील आमदाराचा सर्वोच्च न्यायालयाने जामीन नाकारला, मंत्रीपदाचे स्वप्न भंगण्याची चिन्हे !

खासदार राहुल शेवाळेंना ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल

Big Breaking : शिंदे – फडणवीस यांचे दोन सदस्यांचे मंत्रीमंडळ घटनाबाह्य !

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी