30 C
Mumbai
Friday, September 2, 2022
घरमहाराष्ट्रDhananjay Munde : शिवसेना आमदाराला धनंजय मुंडेंच्या आईचे कौतुक !

Dhananjay Munde : शिवसेना आमदाराला धनंजय मुंडेंच्या आईचे कौतुक !

कैलास पाटील यांनी राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या मातोश्री‍ रुक्मिणीबाई यांची भेट घेतली. त्या कळंब येथे विवाह सोहळयाला उपस्थित होत्या. दरम्यान कैलास पाटील यांनी त्यांच्या तब्बेतीची चौकशी केली आणि आशिर्वाद घेतले.

दोन महिन्यांपूर्वी राज्यात मोठी उलथापालथ झाली. त्यावेळी शिंदेगटाने धमाल उडवून दिली होती. महाराष्ट्रातल्या जनतेने एक वेगळाच राजकीय धुरळा उडतांना पाहिला होता. एकनाथ शिंदे अनेक आमदारांना घेऊन सुरतला गेले. त्यानंतर गुवाहाटी आणि नंतर गोव्याला गेले. हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. त्याच वेळी त्यांच्या गटातून सुखरुप निसटून आलेले एक आमदार म्हणजे कैलास पाटील हे आहेत. त्यानंतर त्यांनी आपल्या सोबत घडलेला प्रकार कथन केला. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र त्यांना ओळखू लागला. याच कैलास पाटील यांनी राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या मातोश्री‍ रुक्मिणीबाई यांची भेट घेतली. त्या कळंब येथे विवाह सोहळयाला उपस्थित होत्या. दरम्यान कैलास पाटील यांनी त्यांच्या तब्बेतीची चौकशी केली आणि आशिर्वाद घेतले.
हे सुद्धा वाचा

Eknath Shinde :‘एकनाथ शिंदेनी तंबाखूला चुना लावला’

Sujay Vikhe Patil : ‘सुजय विखे पाटलांचे प्रेम सनी लियोनी…’

Nilesh Rane : हरिहरेश्वर येथे सापडलेल्या बोटीवरुन निलेश राणेंनी उपटले सरकारचे कान

त्या दिवशी म्हणजे एकनाथ शिंदेगटाने बंडखोरी करण्याचे ठरवले, त्या रात्री खूप मोठया नाटयमय घडामोडी घडल्या. त्यापैकीच एक घटना कैलास पाटील यांच्या बाबतीत घडली होती. ज्यावेळेस ते गुजरातच्या दिशेने जायला निघाले. ते प्रवास करत होते. परंतु आपण नेमके कुठे जात आहोत. कशासाठी जात आहोत ते त्यांना माहित नव्हते. गुजरात सीमेवर पोलिसांचा ताफा होता. त्या दरम्यान त्यांची गाडी चहापानासाठी थांबली होती.

त्यावेळी कैलास पाटील यांनी लघुशंकेच्या निम‍ित्ताने अंधारात धूम ठोकली. पावसात भ‍िजत ते रस्त्यावरुन धावत होते. त्यानंतर एका ट्रकमध्ये बसून ते मुंबईच्या दिशेने आले. त्यानंतर ते मातोश्रीवर दाखल झाले आणि आपल्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर ही घटना माध्यांमुळे संपूर्ण महाराष्ट्राला समजली.

मातोश्रीवर आल्यावर ते धाय मोकलून रडू लागले. एकनाथ शिंदे यांनी भाजप बरोबर राहण्याचे निश्चित केले. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना भाजप सोबत सरकार स्थापन करण्याची अट घातली. आशा प्रकारे शिवसेनेतील बंडखोर नेत्यांनी बंड करून सरकार स्थापन केले. त्यापैकी बंडखोरीत सामील न झालेला नेता म्हणजे कैलास पाटील. त्यांचा सच्चा शिवसैनिक म्हणून सर्वांनी गौरव केला होता.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी