आज २६/११/२०२४ संविधान दिन, महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात साजऱ्या होणाऱ्या या दिवसाच्या काही अशा आठवणी आहे. ज्या आम्ही आज तुमच्यासोबत शेअर करीत आहे. संविधान दिन हा आपल्या देशासाठी इतकाच महत्वाचा आहे जितका स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिना. याची जाणीव आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला माण-फलटण मतदारसंघाचे मा.आमदार दिवंगत धोंडीरामदादा वाघमारे यांनी करून दिली. (Dhondiram Dada Waghmare started the celebration of Constitution Day in Maharashtra)
लाडक्या बहिणीचे पैसे दिले, महागाई वाढवून काढून घेतले
संविधान हा आपल्या देशाचा असा मजबूत पाया आहे. ज्याला कोणीच हलवू किंवा पाडू शकत नाही. १४ वर्षांपूर्वी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष असताना त्यांनी संविधान दिन साजरा करण्याचे ठरविले. त्यापूर्वी इतक्या मोठ्या ऐतिहासिक दिनाची आठवण कोणत्याच सामाजिक किंवा राजकीय संघटनेला झाली नव्हती. म्हणूनच महाराष्ट्रात प्रथमतःच साजऱ्या झालेल्या या सोहळ्याला तत्कालीन मुख्यमंत्री मा.पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे, गृहराज्यमंत्री कृपाशंकरसिंग व अनेक मान्यवर उपस्थित होते. (Dhondiram Dada Waghmare started the celebration of Constitution Day in Maharashtra)
Vidhansabha Election| पाणी आणण्यामध्ये ३६ आमदारांचे योगदान मोठे | एका आमदाराने श्रेय घेवू नये
महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक मान्यवरांचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचा प्रघात तेव्हापासूनच पडला. आजच्या संविधानदिनाच्यानिमित्त १४ वर्षांपूर्वी महाराष्ट्रात पहिल्यांदाच या ऐतिहासिक घटनेच्या स्मृतिनिमित्त साजऱ्या झालेल्या या सोहळ्याच्या आठवणींना आज पुन्हा उजाळा मिळाला. (Dhondiram Dada Waghmare started the celebration of Constitution Day in Maharashtra)