30 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रदोन सामाजात तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई होणार– दिलीप वळसे...

दोन सामाजात तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई होणार– दिलीप वळसे पाटील

टीम लय भारी 

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुडीपाडव्याच्या मेळाव्या केलेल्या विधानाचे तीव्र राजकीय पडसाद उमटत आहे. राज ठाकरे यांनी जाहीर सभेत मशीदीवरील भोंगे न काढल्यास,तिथे हनुमान चालीसा लावू असे विधान केले होते. Dilip Walse-Patil says law and order is important

यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं की दोन समाजत तेढ निर्माण करायचे आहेत. राज्यातील कायदा-सुव्यवस्थे बिघडवण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर आम्ही कारवाई करु असा इशार गृहमंत्र्यांनी दिला आहे. दोन सामाजात तेढ निर्माण केला जात आहे. काही नेते भडकाऊ भाषणे करून समाजासमाजामध्ये संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. ही बाब राज्याच्या व देशाच्या एकतेच्या दृष्टीकोनातून बरोबर नाहीय यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत असेही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.  Dilip Walse-Patil says law and order is important

राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत राज ठाकरेंच्या लाऊडस्पीकरबद्दलच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले ,“भारत हा विविध भाषा, धर्म आणि संस्कृतींचा देश आहे, देशाला एकसंध ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. लोक धर्माबाबत अशी विधाने करतात, हे खरोखरच खेदजनक आहे, यातून त्यांची मानसिकता दिसून येते. Dilip Walse-Patil says law and order is important

मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांच्या मुलाला प्रकाश आंबेडकर यांच्या मुलाने सुजात आंबेडकर यांनी खुलं आव्हान दिलं आहे. सुजात म्हणतात की, माझा तुमच्या वक्तव्याला शंभर टक्के पाठिंबा आहे…फक्त एक गोष्ट आहे.. तिकडे अमित ठाकरेंना हनुमान चाळीसा म्हणायला लावा.. मला एकही बहुजन पोरगा नकोय तिकडे असं म्हणतं सुजात आंबेडकर यांनी राज यांना खुलं आव्हान दिलं आहे.

हे सुध्दा वाचा : 

Maha minister Dilip Walse Patil halts speech for azaan | Watch

दिलीप वळसे पाटील यांनी जयंत पाटील यांचे मानले आभार

महाराष्ट्र पोलीसांची भूतदया!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी