34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमशिदींवर सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय ऐच्छिक असेल : दिलीप वळसे-पाटील

मशिदींवर सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय ऐच्छिक असेल : दिलीप वळसे-पाटील

टीम लय भारी 

मुंबई : महाराष्ट्रात मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून आता मनसेचा मोर्चा सीसीटीव्हीकडे वळला आहे. अध्यक्ष राज ठाकरेंनी ठाण्यातल्या सभेत ३ मेपर्यंतचा अल्टिमेटमच दिले. दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी आज राज्यातील वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी राज्याचे पोलीस महासंचालक देखील उपस्थित होते. बैठक पार पडल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय ऐच्छिक असून सरकारचा त्याला विरोध नाही, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.(Dilip Walse Patil’s decision on CCTV on the mosque)

मंदिरात सीसीटीव्ही आहेत तर मग मशिंदींमध्ये सीसीटीव्ही का नाहीत? असा सवाल मनसेकडून उपस्थित करण्यात आला. यावर बोलताना वळसे पाटील यांनी सांगितले की, कोणत्याही धार्मिक स्थळावर सीसीटीव्ही लावण्यास राज्य सरकार सक्ती करत नाही. ज्यांना सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही लावायचे आहेत त्यांनी ते स्वत:हून लावावेत. जो तो आपापल्या स्वऐच्छेनेप्रमाणे निर्णय घेऊ शकतो.

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सर्व मंदिरांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवली जाते, मग मशिदींमध्येच सीसीटीव्ही का बसवले जात नाहीत, असा सवाल केला. त्यावर वळसे-पाटील म्हणाले की, कुठल्याही धार्मिक स्थळांमध्ये सीसीटीव्ही लावण्यास काहीच हरकत नाही. मंदिर प्रशासन याबाबत पुढाकार घेऊ शकते. मात्र, काही जणांकडून विनाकारण वातावरण तापवले जात आहे. त्याकडे जास्त लक्ष देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.


हे सुद्धा वाचा :

शासन परवानगी, कायदेशीर सल्ला आणि निविदेला बगल देत मुंबई विद्यापीठात बेकायदेशीर चित्रीकरण!

बेस्टच्या प्रवाशांसाठी ‘टॅप इन, टॅप आउट’ सुविधा सुरू, अदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन

भाजपाने भोंगा वाजवताच मुंबई पालिका प्रशासनाला जाग, वरिष्ठ अधिकारी नालेसफाईसाठी रस्त्यावर : आशिष शेलार

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी