33 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
Homeमहाराष्ट्रअभिजित कांबळे यांना दीनमित्रकार मुकुंदराव पाटील राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार

अभिजित कांबळे यांना दीनमित्रकार मुकुंदराव पाटील राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार

दिनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीच्या वतीने सत्यशोधक विचारांशी बांधिलकी असणाऱ्या पत्रकारास व साहित्यास दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीच्या वतीने १९९५ पासून दरवर्षी पुरस्कार दिले जातात. यंदाचा राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’चे संपादक अभिजित कांबळे यांना जाहीर झाला आहे.

दिनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीच्या वतीने सत्यशोधक विचारांशी बांधिलकी असणाऱ्या पत्रकारास व साहित्यास दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीच्या वतीने १९९५ पासून दरवर्षी पुरस्कार दिले जातात. यंदाचा राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’चे संपादक अभिजित कांबळे यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती स्मारक समितीचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी दिली. यापूर्वी दीनमित्रकार मुकुंदराव पाटील राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराने ज्ञानेश महाराव, संजय आवटे, संध्या नरे-पवार, विजय चोरमारे, सचिन परब यांना सन्मानित करण्यात आले आहे.

दीनमित्रकार सत्यशोधक मुकुंदराव पाटील पत्रकारिता पुरस्कार जेष्ठ पत्रकार व म.टा. ऑनलाइनचे संपादक अभिजित कांबळे (मुंबई) यांना जाहीर झाला आहे. तर साहित्य पुरस्कार दयाराम पाडलोस्कर, गोवा (बवाळ-कथा), प्रा. शिवाजीराव बागल, सोलापूर (ज्ञानमंदिरातील नंदादीप-कादंबरी), डॉ. नारायणा भोसले, मुंबई (देशोधडी -आत्मचरित्र), श्रीमती. सारिका उबाळे, अमरावती (कथार्सिस-काव्य), भारत सातपुते, लातूर (आम्ही फुले बोलतोय-बालकाव्य), प्रा. वसंत गिरी, बुलढाणा (तरुणांचे आयडॉल सुभाषचंद्र बोस-चरित्र), डॉ. प्रतिभा सुरेश जाधव, नाशिक (अस्वस्थतेची डायरी-वैचारिक लेखन), डॉ. तुकाराम रोंगटे, पुणे (आदिवासींचेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर-समिक्षा), राकेश सांळुके, सातारा (दख्खण समृद्ध प्रवास-प्रवासवर्णन), योगेश प्रकाश बिडवाई, मुंबई (कांद्याची रडकथा शिवार ते बाजार-संशोधन), डॉ. शिवलिंग मेनकुदळे,पुणे (प्रबोधनाचा वसा आणि वारसा-व्यक्तिवेध) यांना जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांचे वितरण रविवारी १८ डिसेंबरला तरवडी येथे महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षीत यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती उपाध्यक्ष बाबा आरगडे यांनी दिली.
हे सुद्धा वाचा
होय, आम्ही ‘उजवेच’ आहोत… (आमदार ॲड्. आशीष शेलार यांचा विशेष लेख)
वडगाव मावळ सहायक निबंधक कार्यालयाला मिळेना अधिकारी; सर्वसामान्य नागिरकांच्या कामांचा खोळंबा
पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक नसल्याने महिला अत्याचाराच्या घटनांत वाढ, अत्याचार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना व प्रभावी अंमलबजावणीची गरज : प्रा. डॉ. मनीषा कायंदे

दिनमित्रकार मुकुंदराव पाटील हे महात्मा फुले यांच्या सत्यशोधक पत्रकारीचेचा वारसा चालविणारे विद्रोही पत्रकार होते. ग्रामीण भागातून देखील त्यावेळी त्यांनी पत्रकारिता करत बहुजन वर्गात विचारांचा जागर पेरला. महात्मा फुले यांचे कार्य मुकुंदराव पाटील यांनी आपल्या दिनमित्रमधूम पुढे नेले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी