25 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरमहाराष्ट्रनवरा-बायकोच्या अतुट नात्याचा सण दिवाळी पाडवा

नवरा-बायकोच्या अतुट नात्याचा सण दिवाळी पाडवा

भारतात दिवाळी सणाला अधिक महत्त्व आहे. या सणादिवशी चिमुरड्यांना १५ दिवस शाळेला सुट्टी असते, यामुळे नातेवाईक सहकुटुंब एकत्र येऊन दिवाळी सण साजरा करतात. या दिवाळी सणांमध्ये ५ दिवस वेगवेगळे सण असतात. (Diwali Festival) दिवाळीच्या पहिल्या दिवशी वसुबारस हा सणाचा दिवस असतो. तर दुसरा दिवस हा धनत्रयोदशी आणि सणाच्या तिसऱ्या दिवशी नरकचतुर्दशी असते. तर चौथ्या दिवशी नवरा-बायकोच्या संसाराला अबाधित ठेवण्यासाठी दिवाळी पाडवा (Diwali Padwa) सण साजरा केला जातो. दिवाळी सणामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असते. आजच्या दिवशी (१४ नोव्हेंबर) दिवाळी पाडवा सण साजरा केला जातो. शुद्ध प्रतिपदा हा दिवस बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा (Diwali Celebration) म्हणून साजरा केला जातो.

या दिवशी घराभोवती रांगोळी कढली जाते आणि नवनवीन कपडे घातले जातात. दिव्यांनी परिसर सजवला जात असून दिवाळी पाडव्याला एक खास परंपरा आहे. दिवाळी पाडव्याला माहेरच्या आणि सासरच्या पुरुषांना तेल लावण्याची परंपरा आहे. वडीलधारी व्यक्तींचा मान ठेवला जातो. आणि पत्नीने पतीला ओवाळले जाते. हा सण खरं तर अधिकाधिक नवरा बायकोच्या नात्यांना एकनिष्ठ ठेवण्याचे प्रतिक म्हणजे दिवाळी पाडवा सण आहे.

हे ही वाचा

‘वकील शरद पवारांना म्हणतात सॉरी’

पाकिस्तान संघ वर्ल्डकपमधून बाहेर जाताच भूकंप

प्राजक्ता माळी ‘करोडपती’मध्ये ‘बिग बीं’ना काय म्हणाली?

नवविवाह दांपत्यांसाठी हा सण अधिक पवित्र आहे. नवरीची पहिली दिवाळी साजरी करताना तिला माहेरी पाठवले जाते. तर काही वेळी दिवाळी पाडव्यानंतर भाऊबीजसाठी नव्या नवरीला पहिली दिवाळी साजरी करण्यासाठी माहेरी पाठवले जाते. या दिवशी नवऱ्याला आपल्या पत्नीने ओवाळण्याची पद्धत आहे. तीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त असं या दिवसाचं वर्णन करतात. आपला वैवाहिक संसार उज्ज्वल व्हावा आणि दोघांमधील प्रेम, आपुलकी, जिव्हाळा सतत वाढत रहावा यासाठी यासाठी दिवाळीतील आजचा ‘दिवाळी पाडवा’ हा दिवस खास आहे.

बलिप्रतिप्रदा म्हणजे काय?

बलिप्रतिप्रदेची पूजा देखील आजच्या दिवशी केली जाते. पूर्वी बळिराजा हा शेतकरी राजा होता. त्याला विष्णुच्या वामन अवताराने मारले आहे. ग्रामीण भागात अजूनही बळिचं राज्य यावं, यासाठी ‘इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो’ अशी म्हण रूढ आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी