22 C
Mumbai
Saturday, December 10, 2022
घरमहाराष्ट्रdiwali wishes: समीर वानखेडे, क्रांती रेडकर यांच्या घरी रामदास आठवलेंची खास भेट;...

diwali wishes: समीर वानखेडे, क्रांती रेडकर यांच्या घरी रामदास आठवलेंची खास भेट; वाचा काय म्हणाल्या क्रांती रेडकर

समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर यांच्या घरी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले आणि त्यांच्या पत्नी सीमा आठवले यांनी सदिच्छा भेट दिली.

सध्या दिवाळीचा उत्साह सर्वत्र दिसत असून दिवाळ सणाची लगबग सुरू आहे. घरी पै-पाहूणे, सगेसोयरे, मित्र, हितचिंतकांच्या शुभेच्छांसाठी भेटीगाठी सुरू आहेत. सध्या दिवाळीचा उत्साह सर्वत्र दिसून येत आहे. अनेक सेलिब्रिटी दिवाळीसणाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्या घरी दिवाळीच्या निमित्ताने खास पाहुण्याने भेट देत शुभेच्छा दिल्या आहेत. याबाबत समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत माहिती दिली आहे.

समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर यांच्या घरी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले आणि त्यांच्या पत्नी सीमा आठवले यांनी सदिच्छा भेट दिली. क्रांती रेडकर यांनी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये एनसीबीचे माजी अधिकारी आणि क्रांती रेडकर यांचे पती समीर वानखेडे, क्रांती रेडकर, समीर वानखेडे यांचे वडील, बहिण देखील दिसत आहेत.

हे सुद्धा वाचा :

Arvind Kejriwal : केजरीवाल म्हणतात दिल्ली सर्वाधिक प्रदुषित शहरांपैकी नाही!

Crime : मंत्री दादा भुसेंचा डॅशिंग अवतार; बंगल्यात घुसून दरोडेखोराला पकडले

Anandacha Shidha : सर्वसामान्यांना आनंदाचा शिधा पडतोय महागात

इंस्टाग्रामवर केलेल्या पोस्ट मध्ये क्रांती रेडकर म्हणतात, आदरणीय केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर आमच्या घरी भेट देत आशिर्वाद दिल्याने अत्यंत सन्मानजनक अनुभव आहे. तसेच आठवलेंसोबत दिवाळीचा फराळ करतानाचे फोटो देखील क्रांती रेडकर यांनी शेअर केले आहेत. या फोटोमध्ये क्रांती रेडकर यांचे कुटुंब आणि आठवले दाम्पत्य दिवाळी फराळ करताना दिसत आहेत. या फोटोमध्ये त्यांनी समीर वानखेडे, रामदास आठवले आणि सीमा वानखेडे यांना देखील टॅग केले आहे. या पोस्टवर क्रांती रेडकर यांच्या चाहत्यांनी देखील त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय क्रांती रेडकर यांनी लक्ष्मीपूजनाचे, दिपेत्सवाचे फोटो देखील इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत, त्यावर त्यांच्या चाहत्यांनी त्यांना दिवाळीच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!