29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यातील आगीत उद्धवस्त झालेल्या पीडितांच्या हाकेला डाॅ. अमोल कोल्हे यांची साद

पुण्यातील आगीत उद्धवस्त झालेल्या पीडितांच्या हाकेला डाॅ. अमोल कोल्हे यांची साद

टीम लय भारी

पुणे : पुण्यातील हडपसर येथे वैदूवाडीतील झोपडपट्टीत आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत 12 झोपड्या आगीच्या भक्षस्थानी पडल्या, अवघे संसाराचे साहित्य सुद्धा जळून गेले. अचानक उद्भवलेल्या या संकटात तात्काळ मदतीसाठी डाॅ. अमोल कोल्हे धावले असून पीडीतांसाठी ते देवदूतच ठरले आहेत.

याबाबत डाॅ. अमोल कोल्हे यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करीत स्थानिक प्रशासनाला पंचनामे करण्यास सांगितल्याचे माहिती दिली आहे.

डाॅ. कोल्हे त्यांच्या ट्विटर पोस्टमध्ये लिहितात, #हडपसर (पुणे) येथे आग लागून अनेकांचे संसार उध्वस्त झाल्याची दुर्दैवी बातमी समजली. त्यानंतर मी तत्काळ पुणे महानगरपालिका वानवडी क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी श्री. शाम तारू यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला व सदर घटनेची माहिती घेतली तसेच ताबडतोब पंचनामे करून बाधित नागरिकांना मदत करण्याचा सूचना केल्याचे अमोल कोल्हे यांनी सांगितले. 

पुढे डाॅ अमोल कोल्हे लिहितात, “त्यावर त्यांनी आजच पंचनामे करण्यास सुरुवात करणार असून पत्र्याचे शेड, भांडी आदींकरिता 10 ते 15 हजार रुपयांची मदत दिली जाणार असल्याचे सांगितले! सध्या बाधित कुटुंबियांना रक्षकनगर येथील मनपा शाळेच्या हॉलमध्ये स्थलांतरित केले आहे”, असे म्हणून पीडितांच्या हाकेला साद देत तात्काळ मदतीसाठी यंत्रणेला कामाला लावले आहे.

हे सुद्धा वाचा…

विमान कंपन्यांचे दुर्लक्ष; पाकिस्तानच्या कराचीमध्ये पुन्हा उतरवले विमान

देवेंद्र फडणवीसांचे माईक प्रेम आणि बरेच काही…

बंडखोर मुख्यमंत्री आणि त्यांचे फुटीर आमदार महाराष्ट्राचे तुकडे करण्याच्या कुटील कारस्थानाचे ईडीपिडीत पाईक, संजय भोसलेंचा थेट आरोप

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी