34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeएज्युकेशनकौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरूपदी डाॅ. अपुर्वा पालकर यांची नियुक्ती

कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरूपदी डाॅ. अपुर्वा पालकर यांची नियुक्ती

टीम लय भारी

पुणे : महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरूपदाची नियुक्ती करण्यात आली असून या पदावर डाॅ. अपुर्वा पालकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबाबत राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजगता आणि नाविण्यता मंत्रालयाने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.नवनियुक्त डाॅ. अपुर्वा पालकर यांच्याकडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेंटर फाॅर इनोव्हेशन, इनक्युबेशन अॅंड लिंकेजेस या केंद्राच्या संचालक आहेत.

2017 या वर्षी तत्कालीन केंद्रीय कौशल्य आणि उद्योजगता विकास राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी यांनी देशातील पहिले कौशल्य विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन करणार असल्याची घोषणा केली होती. परंतु काही कारणास्तव या विद्यापीठाचे काम तात्काळ होऊ शकले नाही. दरम्यान प्रलंबित असलेल्या कौशल्य विद्यापीठ कायद्याची अंमलबजावणी अखेर 14 एप्रिल 2021 रोजी करण्यात आली आणि या विद्यापीठासाठी डाॅ. अपुर्वा पालकर यांच्या निमित्ताने पहिल्या कुलगुरू विद्यापीठाला मिळाल्या.

कोण आहेत डाॅ. अपुर्वा पालकर?

डाॅ. अपुर्वा पालकर यांनी अहमदाबाद येथील इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मधून व्यवसाय प्रशासन या विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. तब्बल दोन दशकांहून अधिक काळ त्या व्यवसाय प्रशासन हा विषय शिकवत असून या क्षेत्राशी संबंधित त्या संशोधन सुद्धा करत आहेत. व्यवस्थापन विज्ञान अभ्यासक्रमांसाठी अखिल भारतीय प्रवेश परीक्षा आयोजित करणाऱ्या समितीच्या प्रमुख म्हणून सुद्धा त्यांनी काम केले आहे. डाॅ पालकर यांना प्रतिष्ठित रवी जे मथाई नॅशनल फेलोशिप अवाॅर्ड देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

दरम्यान कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरूपद होण्याचा मान डाॅ. अपुर्वा पालकर यांना मिळाला आहे.

हे सुद्धा वाचा…

उद्धव ठाकरे घुसले एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात, ठाणेकरांकडून जबरदस्त प्रतिसाद

ईडीच्या कारवाया मराठी माणसांवर का ?

शिवसैनिकांनी केला काळया टोपीवाल्या राज्यपालांचा निषेध

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी