25 C
Mumbai
Sunday, February 5, 2023
घरमहाराष्ट्रडॉ. प्रज्ञा दया पवार यांचा राजीनामा; फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ ला घोषित झालेला पुरस्कार...

डॉ. प्रज्ञा दया पवार यांचा राजीनामा; फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ ला घोषित झालेला पुरस्कार रद्द केल्याचा निषेध

राज्य सरकारने फ्रॅक्चर्ड फ्रीडम या पुस्तकाला घोषित झालेला पुरस्कार रद्द केल्याच्या निषेधार्थ डॉ. प्रज्ञा पवार यांनी यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे.

राज्य सरकारने फ्रॅक्चर्ड फ्रीडम या पुस्तकाला घोषित झालेला पुरस्कार रद्द केल्याच्या निषेधार्थ डॉ. प्रज्ञा पवार यांनी यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. मराठी भाषा विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र  पाठवून राजीनामा दिला आहे.  २७ मे २०२१ रोजीच्या पत्रानुसार (क्रमांक : सासंम/2021/1202) पवार यांची महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती  करण्यात आली होती.

यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांतर्गत कोबाड गांधीलिखित आणि अनघा लेले अनुवादित ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकाला घोषित झालेला अनुवादित श्रेणीतील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार राज्य सरकारने शासननिर्णय (जी. आर.) काढून रद्द करण्यात आला आहे. तसेच पुरस्कारासाठी पुस्तकाची शिफारस करणारी परीक्षण समितीदेखील  बरखास्त केली गेली आहे. यामुळे तज्ज्ञांच्या निवड समितीचा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकशाही प्रक्रियेचा अवमान झाला आहे, अशी  धारणा झाल्याने त्याच्या  निषेधार्थ डॉ.  पवार यांनी राजीनामा दिला आहे.
हे सुद्धा वाचा
VIDEO: ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ पुस्तकाला मिळालेल्या पुरस्काराची चौकशी होणार

‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ पुस्तकाला मिळालेल्या पुरस्काराची चौकशी होणार; दीपक केसरकरांची माहिती
IPS विश्वास नांगरे पाटील, सदानंद दाते, मिलींद भारंबे, राज वर्धन यांच्यासह 30 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांतर्गत कोबाड गांधीलिखित आणि अनघा लेले अनुवादित ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकाला घोषित झालेला अनुवादित श्रेणीतील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार घोषित करण्यात आला होता. मात्र याबाबत चौकशी करण्याची घोषणा करुन राज्य सरकारने जी. आर. काढून  या पुस्तकाला दिलेला पुरस्कार रद्द केला आहे.  त्यामुळे मराठी साहित्यिकांनी राजीनामा देण्याचे अस्त्र उपसले आहे. पुरस्कारप्राप्त प्रागतिक लेखकांनी निषेध व्यक्त करून पुरस्कारासाठी नकार दिला. राज्य शासनाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या निषेधार्थ पुरस्कार नाकारणारे लेखक डाॅ. शरद बाविस्कर,  आनंद करंदीकर म.रा.साहित्य व संस्कृती मंडळाच्या सदस्यत्वाचा राजीनामा  देणाऱ्या डॉ. प्रज्ञा पवार व अनुवादक अनघा लेले  यांच्या या निर्णयाचे साहित्य क्षेत्रातून स्वागत करण्यात येत आहे.

 

 

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!